लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एंजेल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने (इंग्रजी माध्यम) सलग 16 वर्ष 100 टक्के निकाल लावण्याची परंपरा जपत यंदाही इयत्ता बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. अशी माहिती प्राचार्या खुशबू सिंग यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीचा परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.21) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. विद्यालयातील 75 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्व विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.
बारावीच्या वाणिज्य विभागात दिप्ती राहूल मोटे हिने 89.67 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. गायत्री विनायक चव्हाण हिने 89.33 गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर ममता बस्तीराम पटेल 81.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. विद्यालयाच्या विज्ञात शाखेत सृष्टी मारुती गायकवाड हिने 84.50 टक्के गुण मिळवून प्रथम, तन्वी गजानन बोरकर 82.17 टक्के गुण मिळवून द्वितीय तर आरती महेंद्र काळभोर हिने 79.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, ओम एज्युकेशन सोसायटी संचालित एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हि शैक्षणिक संस्था लोणी काळभोरमध्ये ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. हि संस्था इंग्रजी माध्यमाची असून येथे इयत्ता बालवाडी ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते. या शाळेनी 100 टक्के निकाल लावण्याची सलग 16 व्यांदा यशस्वी परंपरा जपली आहे.
संस्थेच्या पदाधिका-यांनी केले विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन
बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे एंजल ग्रुप ऑफ स्कुलचे अध्यक्ष पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री, संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, संस्थेच्या संचालिका परवीन इराणी, संस्थेचे संचालक अविनाश सेलूकर, एंजल इंग्लिश मिडीयम हायस्कूल च्या प्राचार्या खुशबू सिंग, एंजल हायस्कूल च्या प्राचार्या शमशाद कोतवाल एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख नंदा डोंगरे यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.