पुणे : राज्यातील नऊ जिल्ह्यांना आज (शुक्रवारी) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तीन जिल्ह्यांत शनिवारपर्यंत पाऊस राहणार आहे., अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मात्र, उर्वरित भागात ढगाळ अन् कोरडे वातावरण राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरणामुळे कमालीचा उकाडा जाणवत आहे. पाऊस पडेल असे वाटत असताना गुरुवारी पाऊस झाला नाही.
दरम्यान, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, अजूनही महाराष्ट्रात पावसाचं सावट कायम असल्याचे चित्र आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ भागात यलो अलर्ट
जिल्हा – तारीख
- पुणे – ३१
- रायगड -३१
- रत्नागिरी – ३१, १, २
- सिंधुदुर्ग – ३१, १, २
- कोल्हापूर – ३१ व १
- सातारा – ३१ व १
- सांगली – ३१
- लातूर – ३१ व १
- धाराशिव – ३१