पुणे : भारतीय क्रिकेट संघातील आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इलेक्ट्रिल सायकल उत्पादक कंपनी E-Motorad मध्ये गुंतवणूक (Investment) केलेली आहे, ही माहिती कंपनीचेच संस्थापक आणि मुख्य कार्यकारी कुणाल गुप्ता यांनी दिली आहे. या गुंतवणुकीमुळे धोनीला ई-मोटरॅडमध्ये इक्विटी मालकी मिळेल. तसेच धोनी हा कंपनीचा ब्रॅँड एंडोर्सर म्हणून नवीन भूमिका साकारणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
काही वर्षांमध्ये धोनीने ज्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्या यादीमध्ये पुणेस्थित ई- मोटरॅड सहभागी झालेली आहे, यामध्ये बंगळुरुमधील फिटनेस स्टार्टअप मजबूत राहो. डिजिटल कर्ज देणारा प्लॅटफॉर्म खातेबुक आणि गुरुग्राममधील युझ्ड कार रिटेलर Cars24 यांचा समावेश आहे.
“पुढील भविष्य हे आपल्या हातामध्ये आहे. सध्या आपण अशा युगामध्ये आहोत, जिथे सस्टेनेबल सोल्युशन्सला आकार देण्यात इनोव्हेशन मोठी भूमिका साकारतो आहे, आणि मी नव्या काळातील कंपन्यांचा प्रशंसक असल्याचे महेंद्रसिंग धोनीनं सांगितल्याचे इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे,”
तसेच महेंद्रसिंग धोनीपेक्षा चांगला आणि विश्वासार्ह असा दुसरा कोणताही ब्रॅंड नाही. या ब्रॅँडमध्ये धोनी सहभागी झाल्याने ई-बाइकिंग श्रेणीमध्ये अधिक आत्मविश्वास आणि जागरुकता निर्माण होईल, असे कुणाल गुप्ता म्हणाले.