पुणे : पुण्यातील धायरी परिसरातून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणी ने नकार दिला तरीही तिचा वारंवार पाठलाग करत तिला भर रस्त्यात जबरदस्तीने अडवून अंधारात नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. ‘तु माझ्याशी लग्न केले नाही’ तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार धायरी परिसरात जुन 2024 ते 19 जुलै 2024 या काळात वारंवार घडला आहे.
याबाबत 18 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दिपक प्रकाश गायकवाड (रा. गल्ली नं. 90, जनता वसाहत, पर्वती, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रस्त्यावरुन जाताना आरोपी दररोज तिचा पाठलाग करत होता. तरुणीने त्याला माझा पाठलाग करु नको, असे सांगितले होते तरी देखील तो तिचा पाठलाग करत असे. एके दिवशी ती धायरी येथील रोडवरुन जात होती तेव्हा त्याने दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला.
दरम्यान, त्याने त्याची दुचाकी आडवी लाऊन तिची वाट अडवत गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र, मुलीने बसण्यास नकार दिला. हा सर्व प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितला त्यावेळी तिच्या आईने त्याला फोन करुन जाब विचारला असता तो तिच्या आईसोबत उद्धट भाषेत बोलला.
आरोपीने तिचा हात पकडून तिला एका अंधाऱ्या ठिकाणी जबरदस्तीने घेऊन जात तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. तसेच तु माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन. तु माझी नाही झाली तर मी कोणाचीही होऊ नाही देणार गाडीवर बसण्यास सांगितले.असे म्हणून शिवीगाळ करुन तिला धमकावले. तसेच मुलीचा मोबाईल हिसकावून घेऊन गेला. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.