Ashadhi Ekadashi 2025: राज्यात पंढरपूर वारी ही एक पवित्र तीर्थयात्रा आहे. या वारीचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व असलेली ही वार्षिक यात्रा १८ जून ते १० जुलै २०२५ या कालावधीत होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून २०२५ रोजी देहू येथून निघेल. पंढरपूर वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, जो राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि आध्यात्मिक परंपरांचे दर्शन घडवतो. या कार्यक्रमाला राज्यभरातून आणि परदेशातून लाखो भाविक येतील अशी अपेक्षा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून 19 जून रोजी सकाळी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महारायांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असणार आहे.
पालखीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
– १८ जून: देहू येथून प्रस्थान
– १९ जून ते 10 जुलै: विविध गावातून पालखी जाणार पंढरपूरला
– 5 जुलै : पंढरपूर मुक्काम
-१० जुलै – वारी समाप्ती
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जून २०२५ रोजी आळंदीहून निघणार आहे. आळंदी संस्थानच्या दर्शन मंडप इमारतीमध्ये मुक्काम असणार असून २० जून रोजी आळंदी ते पुण्यातील भवानीपेठ येथे मुक्काम असेल. २१ जून रोजी पुण्यात मुक्काम असणार आहे. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा २२ जून रोजी सासवड पोहोचून शिंदे छत्री व हडपसर विश्रांती येथे विश्रांती आणि २३ जून पर्यंत मुक्काम असणार आहे.
जून महिन्यातील वेळापत्रक कसे असणार, जाणून घेऊया
-२४ जून – सासवड ते जेजुरी प्रवास
-२५ जून – जेजुरी ते वाल्हे प्रवास
-२६ जून – वाल्हे ते लोणंद प्रवास
-२७ जून – लोणंद ते तरडगाव प्रवास
-28 जून – तरडगाव ते फलटण प्रवास
-२९ जून – फलटण ते बरडा प्रवास
-३० जून – बरडा ते नातेपुते प्रवास
जुलै महिन्यातील वेळापत्रक कसे असणार, जाणून घेऊया
-१ जुलै – नातेपुते ते माळशिरस प्रवास
– २ जुलै: माळशिरस ते वेळापूर प्रवास
– ३ जुलै: वेळापूर ते भांडीशेगाव प्रवास
– ४ जुलै: भांडीशेगाव ते वाखरी प्रवास
– ५ जुलै: पंढरपूर येथे मुक्काम
– ६ जुलै : चंद्रभागा नदीवर नगरप्रदक्षिणा व पूजा
– १० जुलै: भगवान विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन आणि वारीची सांगता
पंढरपूर वारी २०२५ च्या पालखीचे वेळापत्रक आणि मार्ग जाहीर करण्यात आला आहे, पालखी विविध गावे आणि शहरांमधून प्रवास करेल. पंढरपूरमधील मुख्य कार्यक्रमापूर्वी २६ जून रोजी वाल्हे ते लोणंद, २७ जून रोजी लोणंद ते तरडगाव, २८ जून रोजी तरडगाव ते फलटण, २९ जून रोजी फलटण ते बरडा, ३० जून रोजी नाटेपुते आणि १ जुलै रोजी माळशिरस येथे मुक्काम असणार आहे.
भाविकांसाठी महत्वाची माहिती
हजारो भाविक पंढरपूरला पायी चालत वारीत सहभागी होतात, वारी ही आध्यात्मिक भक्ती, श्रद्धा आणि शिस्तीचे प्रतीक आहे. भाविकांनाच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी संस्था वारीच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी असतात.