Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घोडनदीचे पात्र कोरडे पडण्यास सुरुवात! शेतकऱ्यांनी नदीला पाणी सोडण्याची केली मागणी

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Friday, 29 November 2024, 10:23

–युनूस तांबोळी

 

शिरुर : टाकळी हाजी ते संगमवाडी दरम्यान घोडनदीचे पाणी संपल्याने शेतकऱ्यांनी नदीला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. या परिसरात कांदा लागवड सुरू झाले असून ऐन लागवडीच्या काळात नदी कोरडी पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

शिरूर तालुक्यातील घोडनदी काठच्या गावांना नदीच्या पाण्यामुळे सुबत्ता आल्याने हा परिसर बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. टाकळी हाजी, निमगाव दुडे, आमदाबाद, डोंगरगण, आण्णापुर, म्हसे, संगमवाडी या भागात कांदा, ऊस, डाळिंब ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून नदीचे पाणी संपले आहे. कांद्याचे रोप लागवडी योग्य तयार झाल्याने शेतकरी नदीला पाणी येण्याची वाट पाहत आहेत.

या संदर्भात घोड व कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे आणि पाणी वापर संस्था चळवळीचे नेते सुभाष झिंजाड यांनी नारायणगाव येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, उपअभियंता दत्तात्रय कोकणे, उपविभागीय अधिकारी आर.जी.हांडे यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण केली जाईल असे आश्वासन भेटी दरम्यान अधिकाऱ्यांनी दिल्याचे वायसे यांनी सांगितले.

आंबेगाव शिरूर विधानसभा निवडणूक पाणी प्रश्न व डिंबा धरणावर होणारा बोगदा या मुद्द्यावरून चांगलाच गाजला होता. या पुढील काळात कुकडीचे पाणी या गावांना मिळेल की नाही. अशी शंका व्यक्त करत गावागावांमध्ये चर्चा रंगलेली पहावयास मिळत आहे.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : ‘अजित मल्टीस्टेट’ सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! कर्जदार, जामीनदार सोडून निरपराध शेतकऱ्याच्या घर-जमिनीवर चढवला २४ लाखांचा बोजा? लोणी काळभोर येथील धक्कादायक प्रकार

Thursday, 30 April 2026, 14:50

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17

Purandar News : पुरंदर विमानतळाला गती! शेतकऱ्यांना एकरी १–१.५ कोटी मोबदला ; १०% विकसित जमीन परत

Thursday, 30 April 2026, 12:55

Bacchu Kadu : बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय ; शिवसेनेत प्रवेशाची घोषणा, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘धनुष्यबाण’ हाती, अटी मान्य झाल्यानंतरच घेतला निर्णय..

Thursday, 30 April 2026, 12:22
Next Post

अखेर मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याची तारीख ठरली! नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांची असेल उपस्थिती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.