दीपक खिलारे
इंदापूर, (पुणे) : तरंगवाडी (Tarangvadi) येथे महिलांसाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम (social and cultural programs) घेण्यासाठी इमारत (Building) उपलब्ध नाही. त्यामुळे आपले माध्यमातून तरंगवाडी (Tarangvadi) गावामध्ये महिला अस्मिता भवन बांधणेसाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीचे निवेदन तरंगवाडी येथील सुप्रिया बहुउद्देशीय महिला विकास संस्थेच्या महिला (Supriya Multi-Purpose Women)पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ( BJP leader and former minister Harshvardhan Patil) यांना भेटून दिले आहे.
तरंगवाडी गावात सुप्रिया बहुउद्देशीय महिला विकास संस्थेच्या वतीने बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध योजना राबवणे संदर्भात जनजागृती केली जात आहे.
जर गावामध्ये महिलांसाठी अस्मिता भवन झाल्यास सदर ठिकाणी महिला एकत्र येतील व विविध उपक्रम राबवता येतील, असे संस्थेच्या अध्यक्षा सविता क्षीरसागर, उपाध्यक्ष मनीषा तरंगे, सचिव मालाबाई तरंगे यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, तरंगवाडी गावातील महिलांनी केलेल्या मागणीनुसार महिला अस्मिता भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे भेटी प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
Indapur | अवकाळी पावसाने पिटकेश्वर येथील पानमळ्याचे नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
Indapur : भिमाई आश्रमशाळेत महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंतीदिनी अभिवादन
Indapur News : इंदापुरातील बेळवाडीत अवकाळीने चंदन बागेचे नुकसान ; शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा..!