पिंपरी: चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार करत डेल ऑर्टो इंडिया प्रा. लि. कंपनीने कामगारांसाठी तब्बल १८ हजार ५०० रुपयांची पगारवाढ केली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चाकण- भांबोली येथील डेल ऑर्टो इंडिया प्रा. लि. आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार करण्यात आला. करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, खजिनदार अमृत चौधरी, दत्तात्रय गवारी, प्रशांत पाडेकर, रविंद्र भालेराव, महादेव येळवंडे, गृपो कंपनीचे युनिट अध्यक्ष संजय पाटील, सोमनाथ जानराव, युनिट अध्यक्ष कमलेश भोकसे, उपाध्यक्ष धनेश निघोजकर, सरचिटणीस पांडुरंग मराठे, खजिनदार बाबासाहेब दरेकर यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.
तसेच, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे डायरेक्टर कमल वाधवा, सीओओ मनोज गर्ग, धरणी सतिशकुमार, एचआर हेड रणपाल सिंह, एचआर मॅनेजर ओंकार चव्हाण यांनी स्वाक्षरी केल्या आहेत. कामगारांनी डीजेच्या तालावर नाचत पेढे वाटले. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला.