Dehu News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला, तीर्थक्षेत्र देहू येथील सर्वे नं. ९७ या गायरान जमीन क्षेत्रातील ५० एकर गायरान जागा देण्यात येऊ नये, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १३) देहूगाव बंद ठेवण्यात येणार आहे. नगरपंचायत, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानने फलक लावून ‘बंद’चे आवाहन केले आहे.
पोलीस आयुक्तालयाला ५० एकर जागा देण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला तीर्थक्षेत्र देहू येथील सर्वे नं. ९७ या गायरान जमीन क्षेत्रातील ५० एकर जागा देण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू आहेत. (Dehu News) देहूगाव ग्रामस्थांचा या बाबीला तीव्र विरोध आहे. या जागेचा वापर गावच्या विकासासाठी करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
भक्तनिवास अन्नछत्रालय, वाहनतळ, विश्रामगृह, संग्रहालय, क्रीडांगण, रुग्णालय, उद्यान, सांस्कृतिक भवन यांसह आध्यात्मिक, गावयात्रा, पालखी सोहळा, श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा, कार्तिक यात्रा, सुरू बीज सोहळा, आषाढी पालखी सोहळा, आध्यात्मिक, धार्मिक अशा विविध कार्यक्रमांसाठी आणि विविध विकासकामांसाठी या जागेचा वापर होऊ शकतो. (Dehu News) या कामांसाठी जागा अपुरी पडणार असल्याने, येथे पोलीस आयुक्तालय उभारू नये, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करत, विरध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे गायरान जागा देण्यास विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी देहू परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. (Dehu News) चौकात, परिसरात फलक लाऊन बंदचे आवाहन केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Dehu News : वारकऱ्यांवरील हल्ल्याचा देहू संस्थानकडून निषेध; घटनेचं आत्मचिंतन करण्याचं आवाहन!
Dehu News : निकोप राजकारणासाठी रोहित पवार यांचे तुकोबाचरणी साकडे; म्हणाले…
Dehu News| देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे ; उमेश मोरेंचा केला नऊ मतांनी पराभव…!