केडगाव : श्री नागेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. केडगावचे चेअरमन संपत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली व व्हाईस चेअरमन विठ्ठल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दीपक शेळके व मनोज देशमुख यांची तज्ञ संचालकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
नवनियुक्त तज्ञ संचालक शेळके व देशमुख यांनी आपली 11 संचालक व 2 तज्ञ संचालक मंडळाची ही सहकारी संस्था आपल्या कारकीर्दीत आणखी चांगल्या स्वरूपाने नावलौकिक मिळवेल व तळागाळातील लोकांपर्यंत सर्व सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगितले.
या दोन्ही नवनिर्वाचित संचालकांचा संस्थेचे सचिव पवार यांनी सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सभासद वर्ग मोठ्या उपस्थित होते.