शिक्रापूर (पुणे) : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील माळीमळा येथे दत्ता भुजबळ यांच्या खोलीत राहणारे जयंत राखे हे घरात झोपलेले होते. त्यानंतर तीन दिवसांपासून खोली उघडली गेली नाही. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील नागरिकांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले असता घरात जयंत मधुसूदन राखे (वय ५६, रा. माळी मळा तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे; मूळ रा. मांडील चौक, यवतमाळ, ता., जि. यवतमाळ) यांचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. याबाबत ओंकार शशिकांत मुणगेकर (वय ३४, रा. यमुनानगर, निगडी पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल नलगे करत आहेत.