बारामती: बिग बॉस मराठी विजेत्या सूरज चव्हाण याच्या मोरटी (ता. बारामती) गावात त्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. बारामती तालुक्यातील दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने बांधकाम सुरू असलेल्या बांधकामाची रविवारवारी (दि. १३) पाहणी केली. बिग बॉस विजेता झाल्यावर सुरज चव्हाण महाराष्ट्रभर चर्चेत आला. सूरजची घर बांधण्याची इच्छा होती. त्याला घर बांधून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.
अजित पवारांनी दिलेले आश्वासन आता पूर्णत्वास येत असून, याबाबतचा आढावा घेण्यासाठी रविवारी अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सांगितले की, मी शब्दाचा पक्का आहे आणि तो शब्द पूर्ण करतोय. बांधकामाचा आढावा घेतला. तसेच घराचे काम करणाऱ्या ठेकेदाराला सूचना देत दिवाळीपूर्वी घराचे संपूर्ण काम पूर्ण करण्यास सांगितले. या वेळी अॅड. राहुल बनकर उपस्थित होते.