केडगाव / गणेश सुळ : दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्षपदी उत्तमराव आटोळे यांची निवड करण्यात आली आहे. उत्तमराव आटोळे यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी दिले.
उत्तमराव आटोळे यांनी यापूर्वी पंचायत समिती उपसभापतिपद भूषवले आहे. उत्तमराव आटोळे हे माजी आमदार रमेश थोरात यांचे विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दौंड तालुक्यामध्ये त्यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर असून, शांत, संयमी मात्र तितकीच राजकीय चातुर्य असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
उत्तमराव आटोळे यांच्या निवडीने रावणगाव, पूर्व पट्ट्यात तसेच संपूर्ण दौंड तालुक्यात आनंद साजरा करण्यात येत आहे. माजी आमदार रमेश थोरात आणि सुनील तटकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.