दौंड(पुणे) : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या आरोपीस पोलिसांनी 24 तासात जेरबंद केले आहे. आरोपीवर कलम 309 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रफुल्ल उर्फ बिंटु प्रकाश पानसरे (वय-28, रा. पाटस, ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे. दौंड पोलीस स्टेशन गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी सापळा रचून केली अटक
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस निऱीक्षक संतोष डोके सो यांनी डि.बी.पथकास गुन्ह्याच्या अनुशंगाने सूचना दिल्या. त्यावेळी एक टिम तयार करुन गुन्हा घडलेल्या ठिकाणी सीसीटिव्हि फुटेज तसेच गोपनीय बातमीदाराचे आधारे अज्ञात वाहनाचा व आरोपीचा शोध घेतला. आरोपी पानसरे हा मौजे वरंवड चौकात येणार असल्याने डि.बी पथकाने सापळा रचून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. यावेळी आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेली सोन्याची चैन व वापरलेली कार असे एकूण 5 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, सुभाष राऊत, नितीन बोराडे, पांडुरंग थोरात, शरद वारे, अमीर शेख, अमोल देवकाते, रविंद्र काळे, योगेश गोलांडे यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुप्रिया दुरंदे करीत आहेत.