Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: कांदा काढणीसाठी मजूर मिळेना; शेतकरी हैराण

संदीप टूलेby संदीप टूले
Thursday, 10 April 2025, 21:43

दौंड (पुणे): शेतातील कांदा काढण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू असून कांदा काढणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे व अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

दौंड तालुक्यातील अनेक भागात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. कांदा काढणीसाठी मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने व अवकाळी पावसाच्या भितीने शेतकर्‍यांनी मजुराची वाट न पाहता घरातील लहान मोठ्या सर्व सदस्यांना घेऊन कांदा काढणीची सुरूवात केली आहे. एकीकडे कांद्याला फक्त 10 ते 16 रुपये बाजारभाव असून हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यात भर की काही अवकाळी पावसाची गर्जना व कांदा काढणीसाठी मजूरच मिळत नाहीत. त्यात काढलेला कांदा घरापर्यंत आण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे साधनाचा अभाव आहे. यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

चाळी तयार करून कांद्याची साठवण

कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत कांद्याची रोपे, कांद्याची लागवड, खुरपणी, फवारणी, खते यासाठी शेतकर्‍यांनी वारेमाप पैसे खर्च करून कांदा पीक घेतले आहे. सुरुवातीचं हवामान कांद्याला पोषक असल्याने कांद्याचे पीक जोमदार आले. मात्र, ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. काढलेला कांदा भिजल्यामुळे चाळीत किती दिवस टिकतो, याची शास्वती नसताना सुद्धा अनेक शेतकरी बाजारभावाअभावी पैसा खर्च करून चाळी तयार करून कांद्याची साठवण करीत आहेत.

 

कांदा पावसाने भिजल्याने शेतात पडून

अनेकांचा तर कांदा पावसाने थोडाफार भिजल्याने तसाच शेतात पडून आहे. तर काहींनी काढलेला कांदा प्लास्टीकच्या साह्याने झाकून ठेवला आहे. कारण हा कांदा भरण्यासाठी मजूर मिळेनात, मिळाले तर दुसऱ्या दिवशी येतील की नाही याची शाश्वती नाही. कांदा काढणीसाठी अवाच्या सव्वा मजुरी द्यावी लागत आहे. कारण, सर्वत्र कांदा काढणी सुरू असल्याने 500 ते 600 रुपये एका दिवसाची मजुरी द्यावी लागत आहे. शिवाय कामगारांना छत्री व थंड पाण्याचा जारसुद्धा द्यावा लागत आहे. मजुरांना ने-आण करण्यासाठी पिकअपची सोय करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे

मागील आठ दिवसांपासून दुपारी चारनंतर ढगाळ वातावरण तयार होते. अधूनमधून ढगांचा गडगडाटही होतो. त्यामुळे कांदा काढणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या काळजीत भर पडत आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने काही शेतकरी कांदा लवकर काढत आहेत. तर काही शेतकरी अवकाळी पावसामुळे नुकसान होण्यापेक्षा आणि बाजार उतरले असले, तरी निदान भांडवलाचे पैसे तरी मिळतील, ह्या अपेक्षेने कांदा जमेल तशी विक्री करत आहे.

गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून कांदा काढणीचे नियोजन करत आहे. पण मजुर मिळेना. त्यात मागील दोन दिवसात मजूर मिळाले तर एकरी कांदा काढणीसाठी 14 हजार रुपये मजुरी दर द्यावा लागला. तसेच काठलेला कांदा उचलायला अधिकचा 600 रुपये मजुरी दर द्यावा लागतोय. त्यात कांद्याचे दर पडलेले असल्याकारणाने कांदा चाळीत साठवणूक करावी लागत आहे. त्यामुळं अधिकच खर्चात वाढ झालीय. कांदा लावण्यापासून ते काढण्यापर्यंत खर्च पाहिला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

– विजय शेलार, कांदा उत्पादक शेतकरी (पिंपळगाव)

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची तब्बल अडीच लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.