गणेश सुळ ; केडगाव
Daund News : केडगाव, (पुणे) : तुषार दादा थोरात युथ फाऊंडेशनचा वाहनचालकांसाठी अनोखा उपक्रम..केडगाव, (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गाने लोणी काळभोर – यवत मार्गे येत असल्याने १५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत सोलापूर कडून पुण्याकडे व पुण्याकडून सोलापूर कडे जाणारी वाहने वाघोली – केसनंद – राहू -खूटबाव – चौफुला मार्गे वळविण्यात आली होती. (Daund News)
दर्शकाचे बोर्ड लाऊन वाहन चालकांना योग्य दिशा दाखवण्याचा अनोखा उपक्रम केला आहे.
या वाहतुकीत बद्दल झाल्याने वाहन चालकांची दिशाभूल होऊन ते भरकटला जाऊ नये या उद्देशाने तुषार दादा थोरात युथ फाऊंडेशन खुटबाव यांच्या वतीने या सर्व दिशा दर्शकाचे बोर्ड लाऊन वाहन चालकांना योग्य दिशा दाखवण्याचा अनोखा उपक्रम केला आहे. या फाऊंडेशन मधील कार्यकर्ते स्वतः दिवस भर उन्हात उभे राहून वाटसरुना योग्य असा मार्ग दाखवत होते.या उपक्रमामध्ये तरूनासोबत ज्येष्ठ मंडळी देखील या सेवेत सहभागी झाली होती. (Daund News)
वारकऱ्यांची सेवा तर सगळेच करता परंतू अशा वाहतुकीत बद्दल झाल्याने कोणालाही त्रास होऊ नये यासाठी या तरुण वर्गाचा अनोखा उपक्रम समाजाला वेगळीच दिशा दाखवत आहे. (Daund News) या वाहनचालकांना रस्त्यावर उतरून योग्य मार्ग दाखविल्याने त्याच्या चेहऱ्यावरील होणारा आनंद म्हणजेच आम्हाला पांडुरंगाचे मुख दर्शन घडते अशी प्रतिक्रिया तुषार दादा थोरात युथ फाऊंडेशन मधील कार्यकरत्यांनी दिली.(Daund News)
दरम्यान, यावेळी नानसो थोरात, शिवाजी थोरात, शरद शेलार,संजय थोरात, रामभाऊ थोरात, सुभाष देशमुख, अण्णा ढमढरे, आर डी आबा, निखिल थोरात, अविनाश थोरात,योगेश कदम, अक्षय शिंदे, अमोल पंडित, दिगाबर जगताप, संकेत थोरात, ऋषभ थोरात, भूषण शेलार, शेखर ढोले आदी सदस्य सहभागी होते (Daund News)