Daund News : दौंड, (पुणे) : कानगाव व गार (ता. दौंड) हद्दीत भरदुपारी तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली असून यामध्ये सोने – चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. ०४) दुपारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. या घटनेने कानगाव व गार परिसरात घबराट निर्माण झाली आहे. Daund News
कानगाव ते हातवळण रोडवर कानगाव हद्दीत असलेल्या रोहिदास चौधरी यांच्या घरात अज्ञात चोट्याने प्रवेश करून घरातील सोने-चांदीचा मौल्यवान ऐवज चोरून नेला तर काळुराम मोरे यांच्या ही घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोने चांदीचा ऐवज चोरी केली आहे. Daund News
कानगाव गार रोडवर गार हद्दीत बाबासाहेब मरळ त्यांच्या घरातील सोने चांदीचा तसेच काही रोख रक्कम ही या अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लंपास केल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी आणि तेही भरदुपारी कानगाव व गार गावच्या हद्दीत या चोरीच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. Daund News
सध्या थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांची शेतातील शेत कामांची लगबग सुरू आहे. त्यामुळे याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रस्त्यालगत असलेल्या तीन घरांची भर दुपारी घरफोडी करून चोरी केल्याची घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे आदींनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली आहे. या अज्ञात चोरांचा शोधासाठी पथके तैनात केली असून त्यांना लवकरच जेरबंद केले जाईल.
दरम्यान, नागरिकांनी आपले घर व्यवस्थित बंद करावे, काळजी घ्यावी तसेच आजूबाजूला अनोळखी व संशयित अज्ञात व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. Daund News