गणेश सुळ
Daund News : केडगाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडीमध्ये बाळगोपलाच्य स्वरूपात भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा साजरा झाला. वैष्णवांचा मेळावा भरल्याप्रमाणे शाळेला स्वरूप प्राप्त झाले होते. विविध संतांच्या वेशभूषा मुलांनी परिधान केल्याने भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा झाला. दिंडी, पालखी व वारकरी असा रंगतदार पालखी सोहळा व विठू-नामाच्या जयघोषात बालगोपाळांनी परिसर दुमदुमून गेला.
देलवडीतील प्राथमिक शाळेत पालखी सोहळा साजरा
या प्राथमिक शाळेत दिंडीमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या व वारकऱ्यांच्या वेशभूषेत मुले आली होती. शाळेचा परिसर टाळ्यांच्या गजरात नादमधुर झाला होता. सर्व शिक्षकांनी मिळून पालखी सुबक तयार केली होती. (Daund News) गावातील मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन केले. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विठुरायाची पंढरी कागदावर उतरवली होती. ही चित्रे पालखीच्या आजूबाजूला लावल्यामुळे पालखीची शोभा वाढली. विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा-तुकाराम व विठ्ठल-विठ्ठल जय-हरी विठ्ठलाचा जयघोष केला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य व मुख्याध्यापक गुंड सर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्रांगणात पावल्या खेळत, अभंग, भजन, टाळ वाजवीत, सुंदर पताका खांद्यावर घेऊन रिंगण करीत पालखी सोहळा साजरा झाला. (Daund News) यावेळी पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिक टाळा, झाडे लावा, असा संदेश हाती फलक घेऊन विद्यार्थ्यांनी दिला.
एक तासाचा भजन कार्यक्रम अध्यापक व विद्यार्थी यांनी सादर केला. पहिली ते सातवी वर्गातील मुले विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांच्या पारंपारिक वेशभूषेत सजली होती. (Daund News) विठ्ठल-विठ्ठल, ज्ञानोबा माउलींच्या गजरात मुलांनी पालखीचा आनंद अनुभवला.उपस्थित सर्व मान्यवर व शिक्षक यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना संतांचे महान कार्य, समाजप्रबोधन, वारी, दिंडीचा परिचय करून दिला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी यांच्या नियोजनाने पालखी व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी पालखीतील विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व गाथाचे पूजन केले. या पालखीसोहळ्याने संपूर्ण देलवडी गावातून फेरी मारली यावेळी गावातील महिलाच्या वतीने रस्त्यावर शेणाचा सडा टाकून सुबक अशी रागोळी काढली होती. या वैष्णव मेळ्यातील विठ्ल रुख्मिणी यांना पाटावर उभे करून पूजा औक्षण करण्यात आले. (Daund News) भक्तिमय अशा वातावरणात सर्वांनी दिंडी, भजन, कीर्तन, अभंग सादर केले. मुलांनी गोल रिंगण घालून फेर धरला. फुगड्या घातल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी मध्ये भक्तीमय वातावरण निर्मितीने शाळेत रंगत भरली. धरीला पंढरीचा चोर, देव माझा माझा, विठ्ठल नामाचा गजर ही भक्तीगीते सादर केली. शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक ,शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दूध दराबाबत बैठक सुरू असतानाच रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते आले अन्…
Daund News : दौंडचा कांदा थेट जातोय तेलंगणाला, चांगल्या दरामुळे ‘केसीआर’ चर्चेत….
Daund News : पुणे जिल्हा हळहळला! दिवेकर कुटुंबीयांना अखेरचा निरोप