हनुमंत चिकणे
Daund News : दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेचा आढळून आलेल्या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून, नराधम पतीनेच अपहरण करून खून केला तसेच मृतदेह हा शेजारील गावातील उसाच्या शेतात नेऊन टाकला. या प्रकरणी दौंड पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (The husband kidnapped and killed his wife, and threw her body in the sugarcane field)
दौंड तालुक्यातील घटना
सुरेखा संतोष पवार असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून संतोष अहिर्या पवार (वय २८) असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत चंदाबाई नाहिराज भोसले (रा. कानडी ता. आष्टी जि. बीड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Daund News ) दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी अवघ्या चार दिवसातच अपहरण केलेल्या पत्नीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. त्यावरून दौंड पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचे अपहरण केले. त्यानंतर तिचा खून केला आणि तिचा मृतदेह उसाच्या शेतात लपवून ठेवला आणि तो पती पसार झाला होता. (Daund News ) त्यानंतर पोलिसांनी पत्नीचा खून केल्यावरून पतीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने आपल्या खुनाची कबुली दिला आहे.
दरम्यान, मृतदेह आपण दौंड तालुक्यातील लोणारवाडी या गावच्या हद्दीतील वाळुंजकर यांच्या मालकीच्या शेतजमिनीतील असलेल्या ऊसामध्ये ठेवल्याचे सांगितले.(Daund News ) त्यानंतर दौंड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर प्रेत मृताच्या नातेवाईकांनी ओळखले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार, पोलीस हवालदार सुभाष राऊत, मलगुंडे, थोरात, विठ्ठल गायकवाड, गावडे, पोलीस नाईक अमीर शेख, शरद वारे, शैलेश हंडाळ, भागवत, पोलीस कॉन्स्टेबल सागर गलांडे, योगेश गोलांडे, अमोल देवकाते यांनी केली आहे. (Daund News )
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यातील अनिता मोरे यांना सहायक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती
Daund News : संकटावर मात करीत वीरपत्नीने मिळवली पोलिस दलात नोकरी
Daund News : दौंड येथे दहावीच्या मुलीची भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या ; परिसरात हळहळ..