गणेश सुळ
Daund News : केडगाव : रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकाचा विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेमध्ये सोलापूर विभागातून दौंड रेल्वे स्थानकासह इतर दहा रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दौंड स्थानकाचा कायापालट होणार आहे. अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंता (परिचालन) गजानन मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत दिली माहिती
रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेच्या संदर्भात दौंड रेल्वे स्थानकात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आके होते. त्यावेळी बोलताना वरील माहिती परिचालन गजानन मीना यांनी दिली आहे. (Daund News) यावेळी दौंड रेल्वे स्टेशन प्रबंधक जयांत त्रिपाठी, पवन कोल्हे, आरपीएफ आधिकरी सोलंकी, वाणिज्य निरीक्षक सुधाराणी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गजानन मीना म्हणाले कि, कोपरगाव, नगर, कुर्डूवाडी, पंढरपूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, गुलबर्गा या रेल्वे स्थानाकांचाही अमृतभारत योजनेमध्ये समावेश आहे. या योजनेअंतर्गत दौंड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी तब्बल ४४ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे दौंड रेल्वे स्थानकाचां कायापालट घडवून येणार आहे.
विमानतळावर ज्या पद्धतीने सेवा सुविधा प्रवाश्यांना दिल्या जातातत्या धर्तीवर या रेल्वे स्थानकावरही त्याच पद्धतीच्या सुविधा प्रवाश्यांना देण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील असणार आहे. (Daund News) तसा रेल्वे प्रशासन यांचा मानस आहे. प्रवाश्यांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी फलाटमध्येही मोठे बद्दल करण्यात येणार आहे. असेही मीना यांनी सांगितली आहे.
दरम्यान, अमृत भारत स्टेशन योजनेचा उद्घाटन शुभारंभ दिनांक उद्या रविवारी (ता.६) ऑगस्टला सकाळी ९ वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं याच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून होणार आहे. त्याअनुषंगाने दौंड तालुक्यातील नागरिकांनीही या कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे. (Daund News) या उद्देशाने दौंड रेल्वे प्रशासनाने दौंड रेल्वे स्टेशन (आरक्षण खिडकी) प्रांगणात या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोय केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : गृहनिर्माण अभियंत्यांच्या संपामुळे शासनाची घरकुल योजना कोलमडली
Daund News : दौंड तालुक्यातील रेल्वेच्या संबंधित असलेले प्रश्न लवकरच सुटणार – आमदार राहुल कुल