गणेश सुळ
Daund News: खुटबाव: युग पुरुष छत्रपती शिवरायांनी सुमारे साडेतीनशे वर्षे पूर्वी लोकशाहीच्या तत्वावर स्वराज्याची स्थापना केली. अठरा पगड जातीं, बारा बलुतेदार सोबत घेऊन स्वराज्यात ऐक्य घडवले, शत्रूवर जरब बसवत रयतेला स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवरयांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला छत्रपति मिळाला. महाराष्ट्रासह देशभरात ही घटना सुवर्ण अक्षरांनी नोंद घेणारी आहे. (The coronation ceremony is celebrated with great enthusiasm at Khutbav)
अखिल भारतीय मराठा महासंघ व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सहभाग
राज्याभिषेकाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही (Daund News) हा सोहळा 6 जून रोजी महाराजांचा पुतळा अभिषेक, प्रतिमा पूजन तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष मा संजय (तात्या )थोरात यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा व कार्याचा धावता आढावा मनोगतातून व्यक्त केला. (Daund News) या राज्यभिषेक कार्यक्रम वेळी सरपंच गीता गणेश शितोळे, उपसरपंच सुधीर अंकुश थोरात, सदस्य किरण थोरात ,प्रकाश सकट, गणेश शितोळे ग्रामसेवक भाऊसाहेब, गणेश जाधव, रमेश फणसे, हसन पठाण व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : “अमृत भारत” योजनेत दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश; जंक्शनचा होणार विकास