गणेश सुळ
Daund News : केडगाव : नवरात्र, दसरा तसेच दिवाळी सणांमध्ये झेंडूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. सध्या सणासुदीचा उत्साह सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सणासाठी लागणाऱ्या झेंडूचे उत्पादन दरवर्षी पुणे जिल्ह्यासह दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस अत्यल्प प्रमाणात पडल्याने, तसेच अनेक गावांत ऐन पावसाळ्यात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असल्याने, यावर्षी झेंडूच्या लागवडीत घट झाली आहे. त्यामुळे ऐन नवरात्रीत झेंडूची फुले भाव खाणार आहेत. दरवर्षी ८० ते १०० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आतापासून १२० ते १४० रुपये किलो दराने बाजारपेठेत विक्रीला आहेत.
अत्यल्प पाऊस, ऑक्टोबर हिटचा फटका
यंदा अत्यल्प पावसाचा फटका फूल उत्पादनाला बसला आहे. ऐन सणासुदीच्या काळात दौंड तालुक्यात झेंडूचे उत्पादन घटल्याने, याचा परिणाम फुलांच्या दरवाढीवर होणार आहे. (Daund News) भाद्रपद बैलपोळा, नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी आदी मोठ्या सणांदरम्यान झेंडूच्या फुलांचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दौड, पुरंदर, शिरूर, खेड आदी तालुक्यांत नदी, ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडेठाक पडले आहेत. तसेच पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यामुळेच अनेक शेतकर्यांनी झेंडू पिकाचे उत्पादन घेतले नाही. (Daund News) तर ज्या शेतकर्यांनी झेंडू पिकांची लागवड केली होती, त्यातील अनेकांची झेंडूची झाडे पाण्याअभावी करपून गेली.
काही शेतकर्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून झेंडू जगविला, त्या झेंडू उत्पादक शेतकर्यांना फूल विक्रीतून थोडेफार उत्पादन मिळेल, अशी आशा आहे; मात्र ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. (Daund News) यातून अनेकांचे झेंडू पीक वाचणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दसरा-दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
शेतकर्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून झेंडू जगविला. आम्हा झेंडू उत्पादक शेतकर्यांना झेंडूंच्या फूल विक्रीतून दोन पैशांचे उत्पादन मिळेल, अशी आशा आहे; मात्र, ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतच चालला असून, यातून अनेकांचे झेंडू पीकच शिल्लक राहणार नसल्याचे चित्र आहे. आम्ही दसरा-दिवाळी कशी साजरी करायची? असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर आहे. पाण्याअभावी आम्हाला देखील हे पिवळ सोनं जगवणं कठीण झालं आहे.
– ज्ञानेश्वर ढोले,
झेंडू उत्पादक शेतकरी, खुटबाव
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : निवडणूक आयोगाचा ‘सर्व्हर डाऊन’; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची तारांबळ
Daund News : दौंड शहरात मंजूर केलेला कत्तलखाना तत्काळ रद्द करावा; हिंदू संघटनांची आग्रही मागणी
Daund News : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व दिले पाहिजे – माजी आमदार रमेश थोरात..