गणेश सुळ
Daund News : केडगाव : जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने यवत पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना निवेदन देण्यात आले.
सरकारने योग्य न्याय दिला नाही तर आंदोलन तीव्र करणार
यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका अध्यक्ष संजय थोरात म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाने ५८ मूक मोर्चा काढले. मात्र, त्याला कुठेही गालबोट लागले नाही. आता मराठा समाज जागा झाला आहे. सरकार निवडणूक आली की आरक्षण देऊ असे आश्वासन देऊन मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक करते. (Daund News) मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. आज निवेदन देत आहोत, सरकारने योग्य न्याय दिला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल.
यावेळी बोलताना दौंड तालुका उपाध्यक्ष अतुल आखाडे म्हणाले, जालना येथे पोलिसांनी जो लाठीमार केला तो पूर्वनियोजित होता. हजारो पोलिस हेल्मेट घालून सज्ज होते. अश्रुधुराचा वापर, गोळीबार करण्यात आला. लाठीहल्ल्यात तरुण, लहान मुले, महिला जखमी झाले आहेत.(Daund News) ही निषेध करण्यासारखी घटना आहे. ज्यांनी लाठीहल्ला करण्याचा आदेश दिला त्यांनी राजीनामा द्यावा व लाठीमार करणाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करावे, अशी मागणी आखाडे यांनी केली.
यावेळी दौंड तालुका व्यापारी आघाडी अध्यक्ष राहुल शेळके, दौंड तालुका कार्याध्यक्ष दीपक गाढवे, व्यापारी उद्योग कार्याध्यक्ष दत्ता नागवडे, (Daund News) विद्यार्थी आघाडी अध्यक्ष निखिल थोरात, खुटबाव शाखा अध्यक्ष राहुल मिटकरी, चौफुला शाखा अध्यक्ष अक्षय खैरे, चेतन ढवळे, भरत सावंत, विकास जगताप, मुकुंद शिंदे, गणेश विटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : सोरतापवाडी येथील वाहन चालकाला पाटस टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण!
Daund News : दौंडच्या पश्चिम पट्ट्यात अखेर पावसाची हजेरी
Daund News : ‘त्या’ खुनाचा व्हिडिओ असल्याचे सांगत पोलिसानेच केले ब्लॅकमेलिंग!