गणेश सुळ
Daund News : केडगाव : यवत येथील २०० तरुणांनी एकत्रित येऊन दौंड तालुक्यातील विकासकामांच्या मुद्द्यावर आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत ३० जुलै रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यवत येथील तरुण गौरव राजाराम दोरगे व पंचक्रोशीतील शेकडो तरुणांचे अतिशय मजबूत संघटन असल्याने, यवतचे उद्योजक विशाल भोसले व यवत स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते किरण सुभाष यादव यांनी या तरुणांच्या प्रवेशाबाबत पुढाकार घेऊन आमदार राहुल कुल यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे.
यवत पंचक्रोशीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या युवांचे मोलाचे सहकार्य असते. गोरगरीब कुटुंबात सहभागी होऊन नागरिकांच्या कार्यासाठी प्रयत्नशील असणारा हा युवा वर्ग आहे. (Daund News ) आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यात विकासात्मक कामांचा झपाटा लावला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महत्त्वाची कामे त्यांनी तत्काळ मार्गी लावलेली असल्याने दौंड तालुक्यातील तरुणांना राजकीय क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे.
तब्बल २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
यापूर्वी तरुण राजकीय क्षेत्रापासून दूरावल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आमदार राहुल कुल यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले आहे. गेली दोन वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिवजयंती महोत्सव, दहिहंडी महोत्सव, गणेशोत्सव अशा विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या २०० तरुणांच्या गटाने भाजपामध्ये प्रवेश केला असून, आमदार राहुल कुल यांचे नेतृत्व स्विकारले आहे. (Daund News ) दौंड तालुक्यातील मौजे यवत परिसरातील तरुण पिढी मोठ्या संख्येने व झपाट्याने भाजपामध्ये प्रवेश करत असल्याने, यवत येथील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यवत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार विजयी झाले होते, याची सर्वांना कल्पना आहे. मात्र, परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही, हे चित्र काळच स्पष्ट करेल, अशी प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केली.
यवत येथील २०० तरुणांनी आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे काम करण्याचे निश्चित केल्याची प्रतिक्रिया गौरव राजाराम दोरगे व त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली. (Daund News ) याप्रसंगी यवत स्टेशन येथील किरण सुभाष यादव, यवतचे उद्योजक विशाल भोसले, शुभम मासोळी, अक्षय देवकर, दत्ता गाडे, मयूर शेलार, विक्रम वांझरे,अनिकेत वलकुंडे, सूरज ठोंबरे आदी तरुण उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : शिवाजी वांझरे यांनी स्वखर्चाने रस्त्यावर टाकला भराव – नागरिकांकडून कौतुक..
Daund News : पारगाव येथील एटीएम स्फोटकाच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न..