Daund News : दौंड : ‘रोटरी क्लब ऑफ दौंड’च्या अध्यक्षपदी सविता भोर तर सचिवपदी दीपक सोनवणे यांची निवड करण्यात आली. दौंड शहरात पार पडलेल्या पदग्रहण समारंभात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या प्रांतपाल मंजू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सविता भोर यांनी मावळते अध्यक्ष डॉ. राजेश दाते यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. तर दीपक सोनवणे यांनी मावळते सचिव अमिर शेख यांच्याकडून पदभार स्वीकारला.
रोटरीचा पदग्रहण समारंभ साजरा
मंजू फडके यांच्या हस्ते क्लबच्या सन 2023-2024 या वर्षासाठीच्या कार्यकारिणी सदस्यांना यावेळी पीन प्रदान करण्यात आली. सहायक प्रांतपाल प्रा. हनुमंतराव पाटील, दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (Daund News) प्रांतपाल मंजू फडके यांनी दौंड क्लबच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख करत क्लबच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्याचे आवाहन केले. रोटरी इंटरनॅशनल या संस्थेस 118 वर्षांचा प्रदीर्घ सेवा वारसा असून, त्याचे सदस्य म्हणून सेवा प्रकल्प राबविताना नाविन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञान स्वीकारावे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, क्लबच्या नूतन अध्यक्षा सविता भोर या प्रबोधिनी विद्या प्रतिष्ठाण या संस्थेच्या अध्यक्षा असून, त्यांनी क्लब सचिव म्हणून काम पाहिले आहे. (Daund News) नूतन सचिव दीपक सोनवणे हे दौंड तालुका महाविद्यालयात इलेक्ट्रॅानिक्स विभागाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : नाथाचीवाडी येथील मंजूर असलेल्या ७० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन
Daund News : चोर समजून वाटसरूनांच मारहाण; दौंड तालुक्यातील पारगाव येथील घटना