अरुण भोई
Daund News : दौंड : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या तसेच भारतीय राष्ट्रध्वजाची बदनामी करणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना त्वरित अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका घेत दौंड तालुक्यातील पाटस आणि देऊळगाव गाडा येथे सत्यशोधक ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून भिडेंचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
सत्यशोधक ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा
सत्यशोधक ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले नियोजित स्मारक ते विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भिडे यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. (Daund News) या वेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर देऊळगाव गाडा येथील बेटपाटी येथेही भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन दहन करण्यात आले.
राज्य सरकारने भिडेंना तातडीने अटक करावी, राज्यात कुठेही त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी दौंड तालुक्यातील ओबीसी नेते पांडुरंग मेरगळ, सरपंच रंजना पोळेकर, (Daund News) सत्यशोधक ओबीसी महासंघाचे दौंड तालुका प्रभारी रामचंद्र भागवत, कुरकुंभच्या माजी सरपंच जयश्री भागवत, शीतल भागवत, सारिका भुजबळ, अरविंद गायकवाड, गोरख फुलारी आदींनी आपल्या भाषणात भिडे या मनुवादी प्रवृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
याप्रसंगी विशाल बारवकर, अरुण भागवत, गोरक्ष बारवकर, मनोहर कोकरे, प्रताप भागवत, प्रदीप भागवत, गोरख फुलारी, नवनाथ गायकवाड, (Daund News) निलेश बनकर, माऊली जाधव, वसंत साळुंखे, अमोल भागवत, प्रकाश भागवत, धनंजय भागवत, डी. डी. बारवकर, मंगेश रायकर तसेच शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते
Daund News : देलवडी गावच्या विकासकामांमुळे गावचा पायाभूत विकास होणार : माजी आमदार रंजना कुल