संदीप टुले
Daund News दौंड : अनेक वर्षांपासून रखडलेल्या एकेरीवाडी (ता. दौंड) येथील ३० लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाला आज गुरुवार (ता.१३) पासून सुरवात करण्यात आली आहे. (Daund News)
एकेरीवाडी येथील टुले ते शेळके वस्ती व महारनवर वस्ती ते लक्ष्मीमाता मंदिर या अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन भीमा पाटस सह साखर कारखानाचे संचालक विकास शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे संघटक सरचिटणीस उमेश देवकर, तुकाराम ताकवणे सरपंच सोनबाप्पू टुले. उपसरपंच संजय टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
एकेरीवाडी येथील रखडलेलेअंतर्गत रस्ते नवीन बनवावे अशी मागणी सतत नागरिकांकडून होत होती. याची दखल घेत आमदार राहुल कुल यांनी एकेरीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामासाठी ३० लक्ष रुपये मंजूर केले आहे. यामध्ये टुले शेळके वस्ती रोडसाठी १५ लाख तर महारनवर वस्ती ते लक्ष्मीमाता मंदिर रस्त्यासाठी १५ लाख असा ३० लाख रुपयांचा निधी जन सुविधा अंतर्गत खडीकरणासाठी मंजूर केला आहे.
यावेळी बोलताना विकास शेलार म्हणाले की, एकेरीवाडी गावातील एकही रस्ता कच्चा रस्ता राहणार नाही. यासाठी मी आमदार राहुल कुल यांच्याकडे विशेष प्रयत्न करणार आहे. व येत्या काही दिवसातच हे दोन्ही रस्त्यांना आपण डांबरीकरण मंजूर करून घेऊ.
यावेळी बोलताना उमेश देवकर म्हणाले की आमदार राहुल कुल यांचे स्वप्न आहे की माझ्या तालुक्यातील ( दौंड) एकही गावात कच्चा राहता कामा नये. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण आ. राहुल कुल यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते पण आता त्यांची समस्या कायमची दूर होणार आहे.
यावेळी माजी सरपंच मोहन टूले, दत्तात्रय शेलार ( कॉन्ट्रॅक्टर), डी.आर.शेलार , अंकुश टूले,रघुनाथ टुले,संपत थोरात,तुकाराम टूले, चेअरमन चंद्रकांत टूले,ग्रामपंचायत सदस्य गंगाराम टूले,सुभाष टकले,सचिन टूले, रोहिदास टूले,झुंबर महारनवर,प्रशांत महारनवर, भाऊसो टूले, बापू टूले,नामदेव टूले,प्रवीण शेळके,आप्पा टकले,पुरुषोत्तम टूले,संदीप हंडाळ,जयसिंग मदने,तुषार सुपनवर,संतोष जगताप,अमित शेळके व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजपर्यंत या रस्त्याचे काम कधीच झाले नव्हते ,पण आमदार राहुल कुल यांनी आमची मागणी मान्य केल्यामुळे हा रस्ता होत आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.
संपत थोरात
ज्येष्ठ नागरिक
माजी सरपंच मोहन टूले, दत्तात्रय शेलार ( कॉन्ट्रॅक्टर), डी.आर.शेलार , अंकुश टूले,रघुनाथ टुले,संपत थोरात,तुकाराम टूले चेअरमन चंद्रकांत टूले,ग्रामपंचायत सदस्य गंगाराम टूले,सुभाष टकले,सचिन टूले, रोहिदास टूले,झुंबर महारनवर,प्रशांत महारनवर,भाऊसो टूले,बापू टूले,नामदेव टूले,प्रवीण शेळके,आप्पा टकले,पुरुषोत्तम टूले,संदीप हंडाळ,जयसिंग मदने,तुषार सुपनवर,संतोष जगताप,अमित शेळके आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.