गणेश सुळ
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील एकूण १७ गावांतील कोतवाल पदे रिक्त असून, त्यापैकी १४ गावातील कोतवाल पदाची भरती आरक्षण प्रक्रियेच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आल्याचे दौंड तालुका तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले. दौंड तहसील कार्यालयात शुक्रवारी (दि. २९) १४ गाव कोतवाल पदाचे जातीनिहाय आरक्षण निश्चित करुन जाहीर करण्यात आले. २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत कोतवाल पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
१० ऑक्टोबर असणार अर्ज करण्याची शेवटची तारीख
दौंड तहसील कार्यालय येथे २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून अर्जदारांनी विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज दाखल करायचे आदेश दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी काढले आहेत. (Daund News ) दौंड तालुक्यातील रिक्त १४ गावनिहाय कोतवाल पदाची लेखी परीक्षा १५ ऑक्टोबर रोजी होणार असून, १८ ऑक्टोबर रोजी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील रिक्त गाव कोतवाल पदाच्या भरतीसाठी उमेदवार चौथी उत्तीर्ण असावा. मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष इतके असावे. उमेदवार गावात रहिवासी असावा. अशा आवश्यक शासनाने लागू केलेल्या अटी नियमांच्या अनुषंगाने गावहाय कोतवाल भरती प्रक्रिया होणार असल्याचे दौंड तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले. (Daund News ) या दरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास अर्जदारास तात्काळ अपात्र ठरवण्यात येईल, असेही त्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दौंड तालुक्यातील गावनिहाय प्रवर्गानुसार आरक्षण
१) हिंगणीबेर्डी अनुसूचित जाती. २) देऊळगाव राजे अनुसूचित जमाती. (महिला) ३) नांदूर भटक्या जमाती (ब) ४) पोरीपाधीं भटक्या जमाती (क) ५) खामगाव भटक्या जमाती (ड) ६)गिरीम विशेष मागास प्रवर्ग.७) दापोडी इतर मागास प्रवर्ग. ८) पिंपळगाव इतर मागास प्रवर्ग. (Daund News ) ९) दहिटणे इतर मागास प्रवर्ग. १०) बोरीबेल इतर मागास प्रवर्ग. ११) दौंड इतर मागास प्रवर्ग (महिला) १२) पाटस इतर मागास प्रवर्ग (महिला) १३) केडगाव आर्थिकदृष्ट्या दुर्बळ. (EWS)१४) पारगाव आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) महिला. या प्रवर्गानुसार रिक्त गाव कोतवाल पदाची भरती करण्यात येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : धनगर समाजाच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा; पांडुरंग मेरगळ यांची मागणी
Daund News : दौंडच्या ‘आरोग्यदूता’मुळे चिमुकल्या सानवीने घेतला मोकळा श्वास