सागर जगदाळे
Daund News : भिगवण: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील पांडुरंग मोहन नहाने या विद्यार्थ्याने नीट (Neet) च्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून पांडुरंगला ७२० पैकी ६४९ गुण मिळाले आहेत.
पांडुरंगचे प्राथमिक शिक्षण स्वामी चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालय स्वामी चिंचोली येथे झाले. (Daund News ) तर त्याचे ११वी १२वी पर्यंतचे शिक्षण येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे झाले आहे. १२वी झाल्यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात हे घवघवीत यश मिळविले आहे. पांडुरंगचे वडील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे.
ग्रामस्थांनी केला सत्कार
ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील पांडुरंग ने नीट (Neet) च्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवल्याने त्याच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Daund News ) पुढे जाऊन नामांकित कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. ची पदवी संपादित करून ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करण्याचा त्याचा मानस आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल स्वामी चिंचोली मधील जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ शेंद्रे,गजानन नहाने,भाऊ शिंदे,सचिन मुळीक,अक्षय देसाई आदी ग्रामस्थांनी पांडूरंग नहाने याचा सत्कार केला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : अखेर राजेगाव मलठण मार्गावर एसटी बस धावणार; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश