संदीप टूले
Daund News : केडगाव : भीमा पाटस साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी मोठा दणका दिला आहे. कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या उसाचे ५ कोटी ७८ लाख रुपये थकवल्याच्या तक्रारी साखर आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दल घेऊन साखर आयुक्तांनी साखर कारखान्यातील साहित्य जप्तीचे आदेश दिले आहेत. दौंडचे आमदार व भीमा पाटस साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
जप्तीच्या साहित्यातून शेतकऱ्यांचे पैसे परत केले जाणार
भीमा पाटस साखर कारखान्यातील वाढत्या थकबाकीमुळे गेल्या काही दिवसांपासून हा विषय चर्चेत आला होता. या साखर कारखान्यात ज्या शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस आणला होता. त्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे आमचे ५ कोटी ७८ लाख रुपये थकावल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. (Daund News) दरम्यान, यामधील काही शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी दाखल केले होत्या. आमचे पैसे तातडीने मिळून द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.
दरम्यान, साखर आयुक्तांनी या संदर्भात भीमा पाटस साखर कारखान्याला नोटीस पाठवली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत तातडीने खुलासा करावा आणि शेतकऱ्यांची पैसे कधी देणार? याबाबत तातडीने उत्तर द्यावे, अशी विचारणा या नोटीसमध्ये करण्यात आली होती. मात्र, यावरून साखर कारखान्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तसेच शेतकऱ्यांचे पैसे देखील परत केले नाहीत, अशी माहिती आहे. यानंतर आता साखर आयुक्तांनी या संदर्भात कडक कारवाई करत, भीमा पाटस साखर कारखान्यातील साहित्याच्या जप्तीचे आदेश दिले आहेत. (Daund News) या जप्तीच्या साहित्यातून शेतकऱ्यांचे पैसे परत केले जाणार आहेत. एकंदरीत भाजप आमदार राहुल कुल यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : एकेरीवाडीच्या उपसरपंचपदी गंगाराम टूले यांची निवड