गणेश सुळ
Daund News ; केडगाव, (दौंड) : शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन कपडे, बूट, वॅाटर बॅग, स्कूल बॅग घेऊन निघालेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची गडबड, स्कूल चले हम म्हणत… काही विद्यार्थी अक्षरंशः उंटावर विराजमान झालेले होते. तडाम ताशाला ढोलाची साथ अशा वाद्याच्या तालावर मिरवणुकीतून आलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन जंगी स्वागत केले.
शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदाचा सोहळा
हा सर्व सोहळा पालक, पाल्य, शिक्षक आणि ग्रामस्थांनी डोळ्यात टिपून ठेवला. अनेकांनी मात्र या अदभूत सोहळ्याचे चित्रण आपल्या भ्रमणध्वनीवर केले यात नवलच काय? शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ गुरुवारी (ता. १५) पासून सुरू झाले. सर्वत्रच शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदाचा सोहळा साजरा केला जातो. (Daund News ) दौंड तालुक्यात देखील प्रत्येक शाळेत नव्याने प्रवेश घेणारे तसेच पुढच्या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. भिमनगर (ता. दौंड) येथील नवयुग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. नव्याने प्रवेश घेणारे विद्यार्थी यावेळी चक्क उंटावर बसून आले होते.
पुर्वी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची रडारड पहावयास मिळत होती. मात्र जिल्हा परिषदेने पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत हा उपक्रम हाती घेतल्या अनेक ठिकाणी दिमाखदार गणवेशात आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत हा कौतूकाचा विषय ठरू पहात आहे.
उंटावरून आलेल्या या विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षक, पालक व पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी समग्र शिक्षा अंतर्गत पाठ्यपुस्तके देण्यात आली. (Daund News ) या वेळी नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरुमुख नारंग, दिपक सोनवणे, मुख्याध्यापक संदिप मांडे, पंकज सोनवणे, अशोक गिरीमकर, संतोश गवळी, रुपाली निडोनी, लता चितळे आदीसह पालक उपस्थीत होते.
याबाबत दौंड शहर येथील नवयुग शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरूमुख नारंग म्हणाले, “आपला पाल्य शाळेत जायला लागला की आई वडीलांना त्याचे कौतूक असते.( Daund News) विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस हा शैक्षणिक जीवनातला आठवणीचा दिवस ठरतो. या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे हे देखील महत्वाचे कार्य संस्थाचालक, पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी केले पाहिजे. त्यातूनच त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असते.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : आगामी निवडणुकीत दौंडमध्ये तिरंगी सामना रंगणार? कोण आहे तिसरा उमेदवार?
Daund News : सुप्रिया सुळे यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी थापल्या भाकरी तर हाटले बेसन