संदीप टूले
Daund News : केडगाव : संकटकाळी जे मदतीसाठी उभे राहतात, ते आपल्यासाठी देवदूत असतात, याचा प्रत्यय नुकताच शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथील सीमा दत्तात्रय वीर यांना आला. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या तत्काळ मदतीमुळे सीमा यांची आठ वर्षांची मुलगी सानवी हिच्यावर यशस्वीरित्या हृदय शस्त्रक्रिया झाली अन् या चिमुकलीला नवं आयुष्य मिळालं. राहुल दादांनी संकटसमयी आम्हाला मदतीचा हात दिला. तेच आमच्यासाठी देवदूत आहेत, अशी भावनिक प्रतिक्रिया सीमा वीर यांनी व्यक्त केली.
आमदार राहुल कुल यांनी भांबर्डे येथील वीर कुटुंबाला दिला मदतीचा हात; आठ वर्षीय मुलीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया
सीमा दत्तात्रय वीर या भांबर्डे येथील रहिवासी असून, त्यांना दोन गोंडस मुली आहेत. त्यातीलच एक आठ वर्षांची मुलगी सानवी हिच्या हृदयाला जन्मतःच तीन होल होते. (Daund News ) डॉक्टरांनी ही गोष्ट पालकांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, सीमा यांच्या पतीचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे तो आधारही हरपला. पतीचे अचानक निघून जाणे अन् मुलीचे गंभीर होत जाणारे आजारपण यामुळे सीमा वीर खचून गेल्या. त्यातच डॉक्टरांनी सानवीची शस्त्रक्रिया लवकरात लवकर करण्यास सांगितले. त्यासाठी ४ लाख रुपये खर्च येणार होता.
सीमा वीर यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची. शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे आणायचे कुठून, हा त्यांच्यापुढे यक्षप्रश्न होता. अखेर प्रमोद ढमाले (रा. पाटस, ता. दौंड) या नातेवाईकांनी आरोग्यदूत अशी ओळख असणाऱ्या दौंडचे आमदार राहुल कुल यांना भेटण्यास सांगितले. गरजेपोटी सीमा वीर यांनी राहुल कुल यांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती सांगितली. (Daund News ) परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांनी तत्काळ सूत्रे हलवली.
राहुल कुल यांनी मुंबई येथील प्रसिद्ध एस.आर.सी.सी. हॉस्पिटलशी संपर्क करून तत्काळ शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. यासाठी लागणारा ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. येथील डाॅक्टरांच्या पथकाने कौशल्य पणाला लावून सानवी हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. (Daund News ) आज ८ वर्षांची चिमुकली सानवी इतर मुलांप्रमाणेच मोकळा श्वास घेत आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या नावापुढे ‘आरोग्यदूत’ ही पदवी का लावतात, या प्रश्नाचे उत्तर यानिमित्ताने संपूर्ण तालुक्याला मिळाले.
असा आमदार मिळायला भाग्य लागते…
दौंडचे आमदार राहुल कुल हे आमच्यासाठी देवदूत म्हणून उभे राहिले. आम्ही त्यांचे मतदार नसतानाही राहुल दादांनी आमची मदत केली. संकटकाळात भक्कम आधार दिला. (Daund News ) आज त्यांच्यामुळे माझ्या सानवीला जीवदान मिळाले. खरंच असा आमदार मिळायला भाग्य लागते, अशी प्रतिक्रिया सीमा वीर यांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राहू बेट परिसरात दोन बकऱ्यांचा बिबट्याने पाडला फडशा