गणेश सुळ
Daund News : केडगाव: देलवडी (ता. दौंड) येथील प्रतिजेजुरीचा खंडेराया हे भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. खंडेरायाच्या दर्शनासाठी नेहमी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. मुळा -मुठा नदीकाठी वसलेले देलवडी येथील प्रतिजेजुरीचा खंडेराया आज दौंड तालुक्याच्या वैभवात भर घालत आहे. (Lakhs of devotees gather at Pratijejuri in Delawadi in Daund taluka for the darshan of Khanderaya.)
वास्तुकलेचे उत्तम उदाहरण
निसर्गाच्या सान्निध्यात वास्तुकलेचे देलवडीतिल प्रतिजेजुरी खंडोबा मंदिर हे उत्तम उदाहरण आहे. दगडी दीपमाळा,दगडी पायऱ्या, कमानितील उत्तम भिंतीचित्रे व नक्षीकाम यामुळे मंदिराला वेगळाच साज निर्माण झाला आहे. (Daund News)देलवडी मधील खंडोबा मंदिर हे जेजुरी येथील खंडोबा मंदिराची हुबेहूब प्रतिकृती असल्याने देलवडी गावाला प्रतिजेजुरी असे म्हटले जाते.या मंदिराभोवती अंदाजे सुमारे ६०० फूट लांब व १७५ फूट रुंद व १८ फूट उंच चिरेबंदी दगडी परकोट आहे. परकोटाच्या तीन दिशांना प्रवेशद्वार आहेत. एक दक्षिण,उत्तरेला, व एक पूर्वेकडे मुख्य प्रवेशद्वार आहे. तर मंदिराला १०५ कळस आहेत. मंदिरासमोर एक व मंदिराच्या दोन्ही बाजूस एक-एक अशा तीन मोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर १५ फूट लांब व १० फुट रुंद असा नगारखाना आहे.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमलीवरती,फुलराणी ती खेळत होती ! अशा बालकवींच्या उक्तीप्रमाणे देलवडी येथील खंडोबा मंदिर परिसरातील नदिघाट पर्यटकांना साद घालत आहे. (Daund News) या मंदिराच्या उत्तरेस मुळा-मुठा नदीकाठपर्यंत सुमारे 7 एकर क्षेत्रावर नदिघाट वसवला आहे.
सव्वा कोटी रुपये खर्चून खडक न फोडता 3 टप्यामध्ये हा घाट वसविण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने फुलझाडे, फळझाडे, लॉन्स ,पायऱ्या, फरशी काम, पेव्हींग ब्लॉक आदी सुविधाचां वापर करीत घाट सुशोभित करण्यात आला आहे. (Daund News) गावातील तरुण व ज्येष्ठ मंडळी अशा दोन्ही वर्गाकडून या घाट परिसराची व त्यामधील झाडा -झुडपाची देखभाल केली जाते.या सुशोभीकरनात त्याची मोलाची साथ आहे. त्यामुळेच हिरवाईने नटलेला हा घाट पर्यटकांना भुरळ घालत आहे.
!!सर्वात मोठे आईचं बन!!
वृक्षवल्ली आम्हां सोयरी, वनचरे! पक्षीही सुस्वरे आळविती!!
जगतगुरू तुकोबाराय यांच्या ओविप्रमाणे देलवडी गावच्या पश्चिमेला वन खात्याच्या ६ एकर जमिनीवर ६०० देशी झाडाचे नंदनवन फुलले आहे. आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती आई असते. त्यामुळे आईच्या नावाने प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने झाड लावण्याचा नावीन्यपूर्ण असा उपक्रम या देलवडी करांनी केला आहे. (Daund News) आणि तो प्रत्यक्षात देखील उतरवला आहे. म्हणून या उपक्रमाला”आईचं बन ” नाव देण्यात आले.
दररोज शेकडो पर्यटक आईचं बन व प्रतीजेजुरीचा खंडेराया पाहण्यासाठी येतात. या पर्यटकांच्या निवासासाठी देलवडीकर सज्ज होऊन या ठिकाणी भक्ती निवास चे कामकाज अतिजलद गतीने सुरू आहे.(Daund News) पर्यटकांच्या आग्रहाखातर मुळा-मुठा नदीत मासेमारी करणारी मंडळी त्यांना नदीची सफर अगदी मोफत घडवून आणतात.
दरम्यान, देलवडी मध्ये प्रशस्त हॉटेल,अनेक घरगुती खानावळी देखील आहेत. या ठिकाणी मुळा-मुठा नदीचे ताजे मासे खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. (Daund News) याशिवाय हॉटेल मध्ये विविध शाकाहारी मांसाहारी पदार्थची रेलचेल असते. विशेष म्हणजे पुण्यातून प्रत्येक तासाला देलवडी गावामध्ये येणे- जाणे साठी पुणे- पारगाव (५० किमी) अंतर साठी पीएमपीएल सुविधा चालू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : खुटबावच्या भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय बारावीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी
Daund News : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन चोरीच्या घटना उघडकीस, तिघांना बेड्या
Daund News : पतीनेच अपहरण करून पत्नीचा केला खून, हत्या करून मृतदेह फेकला उसाच्या शेतात