गणेश सुळ
Daund News : केडगाव: केडगाव या ठिकाणी रेल्वेतून प्रवास करणारी व्यक्ती पडल्यानंतर त्या व्यक्तीचा एक पाय मोडून डोक्याला गंभीर मार लागला होता. त्या व्यक्तीला मदतीची गरज ओळखून केडगाव मधील तरुणाच्या सतर्कतेने त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.
केडगाव येथील तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला प्राण
रेल्वेतून पडलेल्या व्यक्तीचे नाव दिनेश नल्लप्पा गुलपागे सोलापूर येथून मुबईकडे रेल्वेने प्रवास करत होते. या वेळी पहटेच्या सुमारास ते केडगाव या ठिकाणी रेल्वेतून खाली पडले. यावेळी त्यांना डोक्याला, हात, पाय अशा ठिकाणीं गंभीर मार लागला होता. अशा अवस्थेत देखील ते शेजारी असलेल्या घरी सरपटत जाऊन मदतीसाठी आवाज देऊ लागले. (Daund News ) शेजारील गणेश यांनी यांनी त्यांना अशा जखमी अवस्थेत पाहिले असता त्यांनी त्वरित ग्रामपंचयत केडगाव, केडगाव पोलिस स्टेशन यांना ही बाब कळविली.
सर्वांनी मिळून त्यांना निरामय हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. यानंतर ही व्यक्ती सोलापूर जिल्हा येथील आहे अशी माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, व आकाश नेवसे यांनी संपर्क साधून त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती कळविली. (Daund News ) या अनोखी व्यक्तीसाठी हा सर्व प्रयत्न करून त्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी सर्वजण सर्वोतोपरी प्रयत्न करत होते.
जखमी व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून, उपचार करून तो व्यवस्थित आहे, असे डॉ.विशाल खळदकर यांनी सांगितले तेव्हा सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. (Daund News ) या सर्वांच्या चेहऱ्यावर जखमी व्यक्तीचे प्राण वाचवल्याचा आनंद दिसून आला. या प्रसंगी नितीन जगताप, डॉ विशाल खळदकर,गणेश अटक ,किरण नालकर,तेजस ढेभे , गाडेकर साहेब,कुबेर साहेब,संतोष लोखंडे याचे मोलाचे असे सहकार्य लाभले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : फेरमतमोजणी नंतरही दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर अखेर भाजपचाच झेंडा