Daund News : केडगाव (गणेश सुळ) : बुधवार दि.14 जून ला 1 वाजता संगम येथून योगीराज संतराज महाराज पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले आहे. पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी संतराज महाराज पादुकांना दुधाचा अभिषेक घालून महापूजा करण्यात आली. यावेळी मंदीर परिसरात ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष आणि टाळमृदुंगाच्या गजर सुरू होता. अनेक भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
10 हजार पेक्षा जास्त वारकरी सहभागी
हा संतराज महाराज पालखी सोहळा पुणे ग्रामीण मधील चौध्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोहळा असून हे सोहळ्याचे 56 वें वर्ष आहे. या सुख सोहळ्यामध्ये 10 हजार पेक्षा जास्त वारकरी सहभागी झाले आहेत.(Daund News ) या संतराज महाराज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकवर्गणीतून सहा लाख पन्नास हजार रुपये खर्चून सव्वा 7 किलो चे संतराज महाराज व यशोदा माता यांच्या चांदीचे मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. अशी महिती संतराज महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश महाराज साठे यांनी दिली.
या सोहळ्या निमित्त शांतीनाथ महाराज, सुंदरगिरी महाराज, आमदार राहुल कुल, माझी आमदार रमेश थोरात, विकास आबा ताकवणे, शिवाजी आप्पा वाघोले, बाळासाहेब थोरात , (Daund News ) माऊली ताकवणे,विकास भाऊ शेलार, सयाजी ताकवणे, पोपटभाई ताकवणे,सुदाम कोंडे आदी मान्यवर व विविध पक्षाचे पदाधिकारी,भक्तजन उपस्थित होते.
सोहळ्याचे मुक्काम पुढीप्रमाणे
सोहळा दि.14 रोजी (एकेरिवाडी) ,दि.15(खाडे अनाध आश्रम गलांडवडी), दि.16 (बोरमलनाथ मंदीर चौफुला), दि.17 (देऊळगाव गाडा) , दि 18.(सुपा) , दि.19(कारखेल), दि 20(बारामती), दि 21(तावशी),22 दि(कुरवली), दि 23(रेडा), दि 24 (अकलूज) ,दि 25(वेळापूर) , दि 26(बंडी शेगाव) दि 27 (वाखारी), दि 28 (पंढरपूर ला रवाना होईल) .