गणेश नारंग
Daund News : दौंड :दौंड रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झाला असून त्यामुळे स्टेशनचे रंगरूप बदलणार आहे. दौंडकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Inclusion of Daund railway station in “Amrit Bharat” scheme; Junction will be developed)
विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत अधिका-यांनी दिली माहिती
ही माहिती सोलापूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक निरज कुमार लोहारे यांनी सोलापूर येथे पार पडलेल्या विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत दिली. यावेळी सोलापूर रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रोहित राजेश पाटील व दौंड पुणे प्रवासी संघाचे पदाधिकारी व रेल्वे अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
यावेळी सल्लागार समिती सदस्य रोहित राजेश पाटील यांनी दौंड रेल्वे स्थानक तसेच दौंड कोर्ल्डलाईन रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना उद्भवणाऱ्या समस्या व अपुऱ्या सोयी सुविधांविषयी येणाऱ्या अडचणी सांगून (Daund News) अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले तसेच लोणावळा पुणे लोकल दौंड रेल्वे स्थानकापर्यंत सुरू करण्यात यावी इत्यादी मागण्या विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत रोहित राजेश पाटील यांनी सुचविल्या.
या बैठकीला सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे, अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वाणिज्य प्रबंधक लक्ष्मण रणयेवले, मंडल अभियंता चंद्रभूषण, परिचालक प्रबंधक प्रदीप हिरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (Daund News) रेल्वे अधिकाऱ्यांनी विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांकडून केलेल्या सूचना लक्षात घेऊन सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : खुटबावच्या भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय बारावीच्या निकालात मुलींनीच मारली बाजी