गणेश सुळ
Daund News : केडगाव : ओबीसी समाजाचे आरक्षण व इतर विविध मागण्यासाठी पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने मेंढ्यांचे रिंगण करून रावणगाव येथे तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी धनगर समाजाचे पांडुरंग मेरगळ यांनी केली. तसेच सत्ताधारी प्रस्थापितांना जाब विचारत समाजाने जागृत होत आंदोलनाची धार तीव्र करण्याचे संकेत यावेळी दिले.
रावणगाव येथे रास्ता रोको आंदोलन
धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांचे रिंगण घालून पारंपरिक वाद्य वाजवत सरकारचे लक्ष वेधले. आंदोलकांच्या वतीने प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (Daund News) यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
उपस्थितांच्या वतीने माहिती अधिकार अधिनियम अन्वये पंतप्रधान कार्यालयातील रिक्त पदाविषयी मिळवलेली माहिती फोटो स्वरूपात सर्वांनी दाखविण्यात आली. यामध्ये ओबीसीसाठी जागाच नाही. असेल तर एकदम कमी स्वरूपात आहेत. मग विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिलेले कलम 340, 341, 342 चा उपयोग काय हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहिला. 272 जातीचा ओबीसीमध्ये समावेश असताना अलीकडील काही वर्षामध्ये तीनशेहून अधिक जाती यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. (Daund News) माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले की, विद्यार्थ्यांना विविध जातिसंदर्भात दाखले सादर करावे लागतात. त्याचे पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया त्याच्या निकालावर न होता त्याच्या जाती दाखल्यावर अवलंबून असते, असे मत पांडुरंग मेरगळ यांनी व्यक्त केले.
यापूर्वी ओबीसी समाजाच्या वतीने केडगाव येथील श्रीकृष्ण कार्यालयात समाजाची बैठक पार पडली होती. या बैठकीत ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली होती. (Daund News) त्यानुसार दौंड तालुक्यातील रावणगाव येथे ओबीसी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यासाठी पांडुरंग मेरगळ, महेश भागवत, बाळासाहेब तोंडे, वैभव आटोळे, अमोल धापटे, नवनाथ गायकवाड, दीक्षा सांगळे, विजय गिरमे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी तालुक्यातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंडच्या ‘आरोग्यदूता’मुळे चिमुकल्या सानवीने घेतला मोकळा श्वास
Daund News : राहू बेट परिसरात दोन बकऱ्यांचा बिबट्याने पाडला फडशा