अरुण भोई
Daund News : राजेगाव : राजेगाव (ता.दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला महापारेषणकडून स्मार्ट टिव्ही संच भेट देण्यात आला. बारामती विभागीय कार्यालयाकडे शाळांनी संच मिळावा म्हणून मागणी पत्र सादर केले होते. त्यानंतर स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.
विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणे सोपे होणार
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी प्रकल्पांतर्गत स्मार्टक्लास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्यूशन्सचे ५ संच परिमंडलांतर्गत असलेल्या १. बरगळवस्ती, पॉवर हाऊस कॉलनी, लोणीकंद ता. हवेली, लोणीकंद ता. हवेली ३. राहू ता. दौंड, ४. राजेगाव ता. दौंड, आणि ५. सय्यद वरवडे, तालुका मोहोळ या ५ जिल्हा परिषद शाळांना मंजूर करण्यात आले आहेत. (Daund News) तसेच बारामती विभागात येणाऱ्या राजेगाव आणि राहू या दोन प्राथमिक शाळांना नुकतेच संच देण्यात आले.
बारामती विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल गावडे, प्रमुख लिपिक मारुती नाफड यांनी स्वतः शाळेत येऊन मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे यांच्याकडे संच सुपूर्द केला. (Daund News) यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल गावडे, प्रमुख लिपिक एम. एन. नाफड, मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे, प्रशांत वाघमोडे, दिलीप शिर्के, संजय नेमाने, तुकाराम उगलमोगले, वैशाली कुदळे, योगिता कचरे आदी उपस्थित होते.
महापारेषण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुनील वावरे यांच्या सहकार्याने संच प्राप्त झाला. सदर संच मिळाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणे सोपे होऊन त्यांची प्रगती होण्यास मदत होणार आहे. (Daund News) सामाजिक दायित्व म्हणून संच वाटप केल्याने महापारेषणचे आभार मुख्याध्यापक मेंगावडे यांनी व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : जुलै महिना संपत आला तरी पाऊस काय पडेना ! पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त