जीवन शेंडकर
Daund News : बोरीभडक : माझे वय ६० वर्षे… घरची परिस्थिती बेताचीच… केशकर्नालय चालवून उदरनिर्वाह करत होतो. एक दिवस अचानक डोक्यात असह्य वेदना सुरू झाल्या. तपासणीअंती हा मेंदूचा विकार असल्याचे निष्पन्न झाले. या आजारातून बरे होण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असून, त्यासाठी तब्बल २६ लाख रुपये मोजावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले अन् पायाखालची जमीनच सरकली.
दिवसभर काबाडकष्ट केल्यावर हाता-तोंडाशी गाठ पडणार, या परिस्थितीत एवढी मोठी रक्कम उभी करणे, आव्हानात्मक काम होते. या परिस्थितीत एकच नाव डोळ्यांसमोर आले, दौंडचे आमदार अॅड. राहुल सुभाष कुल… ही व्यक्ती माझ्या आयुष्यात देवदूत बनून आली अन् माझ्यावरील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत पार पडली! मी गरीब असलो तरी आज खऱ्या अर्थाने श्रीमंत झालो. मी ईश्वर पाहिला नाही; माझ्यासाठी अॅड. राहुल कूल हेच ईश्वरासमान आहेत… त्यांच्यामुळेच मला नवजीवन मिळाले!
मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी सहकार्य
बोरीऐंदी (ता. दौंड) येथील ज्ञानदेव विठोबा मगर यांनी पाणावल्या डोळ्यांनी ही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. एकीकडे बेताची आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे एका दुर्धर आजाराचे झालेले निदान… अशा कात्रीत सापडलेल्या मगर यांची जगण्याची इच्छशक्ती मात्र दुर्दम्य होती… केवळ आपल्या कुटुंबासाठी (Daund News) या आजारावर मात करून पुन्हा एकदा नव्या जोमाने उभे रहायचे होते. मात्र, शस्त्रक्रियेसाठी लागणारी रक्कम उभी कशी करायची, हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला होता.
मगर यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच बोरीऐंदी गावचे माजी सरपंच राजेंद्र तावरे यांनी आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, एवढी मोठी रक्कम तत्काळ उभी करणे शक्य नव्हते. अखेर नागरिकांच्या अडीअडचणीत तत्परतेने मदत करणारे, (Daund News) आरोग्यदूत अशी ख्याती असलेले दौंड येथील आमदार राहुल कुल यांचे नाव सर्वानुमते समोर आले. राहुल कुल हे आपल्याला नक्कीच मदत करतील, या आशेने माजी सरपंच तावरे यांनी कुल यांच्याशी संपर्क साधला आणि ज्ञानदेव मगर यांच्या आजारपणाची कल्पना दिली. आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन कुल यांनी तातडीने सूत्रे हलवली…
मगर यांना पुढील उपचारासाठी तत्काळ पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केला. (Daund News) तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अथक प्रयत्नाने मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पार पाडली. तातडीने आणि मोफत उपचार मिळाल्यामुळे आज ज्ञानदेव मगर पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहू शकले.
बोरीऐंदी परिसरातील शेकडो कुटुंबियांचे आरोग्यदूत बनून आमदार अॅड. राहुल कुल तत्परतेने मदतीसाठी धावून जातात. बोरीऐंदी परिसरातील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी राहुल कूल सदैव तत्पर असतात, असे मत बोरीऐंदी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र तावरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, गरजू व्यक्तीला अडचणीच्या काळात केलेल्या सहकार्यामुळे गावातील आजी माजी पदाधिकारी, नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दौंड तालुका नाभिक संघटनेचे जेष्ठ सल्लागार माऊली मगर, अध्यक्ष गणेश साळुंखे, प्रमोद बंड, खजिनदार उमेश मगर यांच्यासह मगर यांच्या कुटुंबियांनी आमदार अॅड. राहुल कुल यांची राहू येथील निवासस्थानी भेट घेऊन, आभार व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : अखेर राजेगाव मलठण मार्गावर एसटी बस धावणार; आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश
Daund News : दौंड तालुक्यातील राजेगावात अवैधपणे माती उपसा जोरात सुरू; प्रशासनाची डोळेझाक