संदीप टूले
Daund News दौंड : दौंड तालुक्यातील राजेगाव, मलठण, आलेगाव, बोरीबेल, काळेवाडी या गावाची एसटी बस सेवा कोरोना काळापासून बंद झाली होती. (Daund News) पण ही सेवा पूर्ववत सुरू व्हावी यासाठी आमदार राहुल कुल यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. (Daund News) आमदार कुल यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, अखेर राजेगाव मलठण मार्गावर एसटी बस धावणार आहे. (Daund News)
या गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थी हे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर दौंडला नियमित येत जात असतात. त्यांना येण्यासाठी जाण्यासाठी दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व्हायचे.
या गावातील नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला. आमदार कुल यांनी दौंड आगार व्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहार करून दौंड-मलठण राजेगाव मार्गावरील एसटी बस पुन्हा चालू करण्याची विनंती केली. त्याचा पाठपुरावाही केला. त्यामुळे या गावांची बससेवा पुन्हा चालू झाली आहे.
दोन वर्षांपासून बससेवा बंद
मागील दोन वर्षापासून आमच्या गावची बस सेवा बंद झाली होती. तेव्हापासून आमच्या गावातील विद्यार्थ्यांचे खूप हाल होत होते. त्यामुळे कित्येक मुलींना शाळा सोडावी लागली. पण आमदार राहुल कुल यांनी आमच्या गावची बससेवा चालू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे.
– गणेश गायकवाड , मा. ग्रामपंचायत सदस्य, हिंगणीबर्डी काळेवाडी