गणेश सुळ
Daund News : केडगाव : जिल्हा परिषद शाळा देलवडी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी किशोर शेलार व उपाध्यक्षपदी स्वाती पंडीत यांची निवड करण्यात आली. ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच विविध सहशालेय उपक्रम अग्रेसर असते.
मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे पालकांकडून अभिनंदन
‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात सहभाग नोंदवल्यामुळे पुणे जिल्ह्यातील एक आगळी वेगळी शाळा असल्याचे संबोधले जाते. 2015 मध्ये शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. उपक्रमशील शाळा म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे. सलग 7 वर्ष जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा लेझिम गटामध्ये मुलांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. (Daund News) याबद्दल मुख्याध्यापक विठ्ठल गुंड व सर्व शिक्षक यांचे पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.
शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी पालक व ग्रामस्थ नेहमीच लोकसहभागातून मदत करीत असतात. जि.प.शाळा देलवडी येथे शाळा विकास हाच मुख्य उद्देश ठेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांची निवड नेहमीप्रमाणे बिनविरोध करुन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे परिसरातून कौतुक होत आहे.
यावेळी या शाळेचा सर्वांगीन विकासासाठी नेहमी सकारात्मक विचासरणी असलेले रज्जाक शेख गुरुजी, राजाभाऊ शेलार, रमेश शेलार, भाऊसो शेलार, राहुल शेलार, संतोष टकले, उल्हास वाघोले, ज्ञानदेव शेलार, पांडुरंग शेलार, सदाशिव नेमाणे, सागर निगडे, विकास जराड व महिला-भगिनी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेचा दर्जा उंचविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील
या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तीन महिला प्रतिनिधी, चार पुरुष प्रतिनिधी, दोन विद्यार्थी प्रतिनीधी, एक शिक्षक प्रतिनिधी, एक ज्येष्ठ नागरिक, 2 ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि एक शिक्षक महिला प्रतिनिधी असे 14 सदस्य संख्या आहे. (Daund News) या सर्वाची शाळेचा विकास हाच मुख्य उद्देश समोर ठेवून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शाळेचा दर्जा उंचविण्यासाठी सर्वजण नेहमीच सर्वोतोपरी प्रयत्नशील असतील.
– विठ्ठल गुंड, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देलवडी
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : केडगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उघड; पैसे हात उसने घेऊन पाईपलाईनची दुरुस्ती
Daund News : एकेरीवाडी येथील ३० लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाला सुरवात