गणेश सुळ
Daund News : केडगाव : दौंड तालुक्यातील देलवडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १७ सप्टेंबर) रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोसायटीस मागील वर्षी व चालू वर्षी मिळालेल्या नफ्यातून सभासदांसाठी १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला, अशी माहिती सोसायटीचे सचिव डी. एन. शितोळे यांनी दिली.
वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात
सोसायटीचे अध्यक्ष रामकृष्ण धुळाजी टुले यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी संस्थेच्या संचालिका सुलोचना विष्णुपंत शेलार यांना व काही दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी सचिव डी. एन. शितोळे यांनी अहवाल वाचन करून, सोसायटीस मागील वर्षी झालेला नफा व चालू वर्षीचा नफा तसेच १३०५ सभासद संख्येवरून १३३६ सभासद झाल्याची माहिती दिली.(Daund News) संस्थेचे ३१ मार्च अखेर १२७४९०९६ रुपये इतके भागभांडवल असल्याचे सांगण्यात आले. चालू वर्षी व मागील वर्षी सोसायटीस नफा प्राप्त झाल्याने सभासदांसाठी १२ टक्के लांभाश वाटप करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाने सर्वानुमते जाहीर केला. हा लाभांश चालू बाकीमधील सभासद तसेच थकीत सभासदांना देखील त्यांच्या शेअर्सनुसार खात्यावर जमा होणार आहे.
या वेळी सचिव शितोळे यांनी कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत मिळणाऱ्या १५० लाभांची उपस्थितांना माहिती दिली. या वेळी संस्थेच्या १०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनेक सभासदांनी संस्थेच्या ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या वर्षाच्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक याबाबत अनेक सूचना दिल्या आणि धोरणात्मक निर्णयाचा आढावा घेतला. (Daund News) थकबाकीदार कर्जदारांनी थकबाकी जमा करून सोसायटीस सहकार्य करावे, असे आवाहनदेखील सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने केले.
या वेळी सोसायटीचे अध्यक्ष रामकृष्ण टुले, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, शिवाजी वाघोले, दत्तात्रय कोंडे, दत्तात्रय शेलार, सोनबापु टुले, अनिल शेलार, ज्ञानदेव शेलार, गणपत लव्हटे, लक्ष्मण टकले, अशोक पवार, गोविंद लवटे, मिलन शेलार, सारिका शेलार, अलका झांजे आदींसह संचालक मंडळ, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड क्रीडा संकुलातील विकासकामांसाठी २ कोटींचे अंदाजपत्रक
Daund News : ‘आयुष्मान भव’ कार्यक्रमाअंतर्गत विविध आरोग्यविषयक सेवासुविधेची जनजागृती