गणेश सुळ
Daund News : केडगाव : माझ्या जीवाची आवडी! पंढरपुरा नेईल गुढी! पांडुरंगी मन रंगले! गोविंदाचे गुण वेधिले! संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (दि.16) वरवंडमधील विठ्ठल- रुख्मिणी मंदिरात मुक्कामी विसावला. फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांच्या वतीने वरवंड चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळा विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात आल्यावर सरपंच मीनाक्षी दिवेकर व उपसरपंच बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते पादुका पूजन व त्यानंतर सामूहिक आरती झाली. (Daund News) या वरवंड गावच्या वतीने 3 क्विंटल लाफशी, भात व 8 पातेली आमटी अशा स्वरूपाचे जेवणाचे नियोजन केले होते. तर रामदास नाना दिवेकर मित्र मंडळ यांच्याकडून झुणका भाकरीचे जेवण देण्यात आले.
दर्शनासाठी मोठ्या रांगा
या पाटस व वरवंड परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यानंतर पालखी सोहळा शनिवारी सकाळी पाटसकडे रवाना झाला. (Daund News) पाटस परिसरात न्याहरी करून हा सोहळा रोटी घाटाच्या दिशेने उंडवडीकडे (ता.बारामती) मार्गस्थ झाला. या सोहळ्याप्रसंगी दौंड तालुक्याला मोठे जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. पहाटेच आल्हाददायक वातावरणात दिंद्यांमधून ऐकू येणारे अभंगाचे स्वर व दर्शनासाठी केलेली गर्दी असं चित्र दौंडकराच्या मनात रूचले गेले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : समाजकल्याण विभाग पूणे यांचेकडून दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य
Daund News : तुषार दादा थोरात युथ फाऊंडेशनचा वाहनचालकांसाठी अनोखा उपक्रम..