Daund News : दौंड : दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. आमदार राहुल कुल यांनी याबाबत संबंधित विभाग प्रमुखांसह रुग्णालयास भेट देऊन, याबाबतचा आढावा घेतला.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन
दौंड तालुक्यातील गोर-गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, वैद्यकीय चाचण्या माफक दरात उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१८ मध्ये दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या ५० खाटांच्या रुग्णालयात वाढ करून, १०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन व विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे ३३ कोटी ५० लाख रुपयांचा निधीची तरतूद केली होती. (Daund News) उपजिल्हा रुग्णालयाचे हे काम लवकरच पूर्णत्वास येत असून, एक सुसज्ज रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरु होईल, असा विश्वास आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.
या वेळी दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीच्या कामाची पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. (Daund News) या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता हरिश्चंद्र माळशिकारे, सहाय्यक अभियंता मयूर सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुभाष खिलारे, ज्येष्ठ नेते नंदुभाऊ पवार, राजेश पाटील, हरिभाऊ ठोंबरे, डॉ. दीपक जाधव, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड क्रीडा संकुलातील विकासकामांसाठी २ कोटींचे अंदाजपत्रक
Daund News : आयुष्मान भव ; कार्यक्रमाअंतर्गत विविध आरोग्यविषयक सेवासुविधेची जनजागृती
Daund News : देलवडी गावच्या माजी उपसरपंच सुलोचना विष्णुपंत शेलार यांचे अल्पशा आजाराने निधन