अरुण भोई
Daund News : राजेगाव : ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात आले असून, आजपासून राजेगाव येथे अभियानाची सुरुवात झाली.
नागरिकांचा सक्रीय सहभाग
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राजेगाव ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, आरोग्य विभागासमोरील परिसराची स्वच्छता करण्यात आली. या वेळी राजेगावचे सरपंच प्रवीण लोंढे, ग्रामसेवक आजिनाथ पाहुणे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे स्थापत्य अभि. सहाय्यक अनिल गुणवरे, (Daund News ) दौंड ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मेंगावडे, तंटामुक्ती अध्यक्ष शहाजी गुणवरे, आरोग्य सेविका, सोपान चोपडे, सागर जाधव, मिलिंद मोरे, निलेश चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यात कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत जाहीर
Daund News : धनगर समाजाच्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा; पांडुरंग मेरगळ यांची मागणी
Daund News : दौंडच्या ‘आरोग्यदूता’मुळे चिमुकल्या सानवीने घेतला मोकळा श्वास