अरुण भोई
Daund News राजेगाव : राजेगाव येथे स्वामी समर्थ हॉस्पिटल (आयसीयू) अॅण्ड मॅटर्निटी होम व दिव्य समाज निर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार निदान, पोटाचे आजार, जुलाब, उलट्या यासह इतर अनेक आजारांचे निदान आणि उपचारपद्धतीचा सल्ला देण्यात आला. (Daund News)
राजेगाव येथील गुलमोहर लॉन्स येथे हे आरोग्य शिबिर पार पडले. यामध्ये अनेक वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या. यामध्ये लिव्हर, कावीळ, फुफ्फुसाचे आजार, दमा, न्युमोनिया, टीबी, संसर्गजन्य आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, थायरॉईड, आमवात, किडनीचे आजार, मोफत शुगर चाचणी, मोफत ईसीजी, मोफत मोतीबिंदू निदान व नेत्रतपासणी करण्यात आली. या शिबिरात बुधराणी हॉस्पिटलचा सहभाग होता.
या शिबिराला स्वामी समर्थ हॉस्पिटलचे डॉ. नितीन काळे, दौंड कृषी बाजार समितीचे संचालक भारत खराडे, राजेश्वर विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन अमोल मोरे, दौंड तालुका शिवसेना डॉक्टर सेलचे समन्वयक डॉक्टर प्रमोद रंधवे, बुधराणी हॉस्पिटलचे वैभव गाढवे, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कर्ते राजेंद्र कदम, भरत मोरे, स्वामी समर्थ हॉस्पिटलचे प्रवीण बोर्डे, दिलीप सुरवसे तसेच दिव्य समाज निर्माण संस्थेच्या सचिवा सीमा शितोळे-देशमुख उपस्थित होत्या.