गणेश सूळ
Daund News : दौंड : एखाद्या जागेची वीजबिल थकीत असेल आणि त्या जागेची खरेदी व्यवहार झाल्यास नवीन मालकाने थकबाकी भरल्याशिवाय त्याला नवीन वीजजोडणी दिली जात नाही. त्या जागेचे उत्तरदायित्व ही नवीन मालकाकडे येत असते. त्यानुसार नागरिकांनी जागा घेण्यापूर्वी विजबिलाची थकबाकी नसल्याची खातरजमा करावी. असे आवाहन महावितरण चे पुणे परिमंडळातील मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले आहे. (Check the electricity bill while buying a flat or else you will have to pay the arrears – Chief Engineer Rajendra Pawar)
महावितरण पुणे परिमंडळांतर्गत तब्बल ४१७ कोटी रुपयांची थकबाकी
महावितरण च्या पुणे परिमंडळा अंतर्गत असणाऱ्या ग्राहकाकडे तब्बल ४१७ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समजले. त्यामुळे या परिमंडळ अंतर्गत २ लाख ६६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (Daund News) या खंडित विजोडणीची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे असेही राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.
विद्युत कायदा २००३ नुसार जेव्हा वीज पुरवठा केला जातो, तेव्हा त्या जागेसाठी पुरवठा करण्यात आला होता. त्या जागेचाच भोगवटादार ग्राहक बनतो. (Daund News) परंतु एखाद्या जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या विजबिलाच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना आहे. असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यामुळे ग्राहकांनी जुनी सदनिका खरेदी करताना सावध व्हा त्यांचे वीजबिल तपासा, त्या थकबाकीची वसुली करण्याच्या सूचना व अधिकार महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यासह आणखी काही राज्यातून अशा प्रकारची १९ प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.(Daund News) त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना जागांची मालकी बदलली तरी पूर्वीच्या विजबीलाच्या थकबाकीची वसुली करण्याचा अधिकार वीज कंपन्यांना असल्याचे स्पष्ट केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानाचा दौंडकरांनी घेतला लाभ
Daund News : नाथाचीवाडी येथील माटोबा विद्यालयात तब्बल २२ वर्षानंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा”
Daund News : शेतकरी हवालदिल! टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी