राहुलकुमार अवचट
दौंड Daund News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दौंडमध्ये (Daund News) येत सभा घेतली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आमदार राहुल कूल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता. (Daund News) याचा परिणाम दौंड (Daund News) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत होईल असे बोलले जात होते. मात्र भाजपचे आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती सत्ता असलेल्या बाजार समितीमध्ये खिंडार पाडले आहे. (Daund News)
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी निवडणूक
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ नऊ समान जागा मिळाल्या आहेत. यामुळे माजी आमदार रमेश थोरात यांच्या बाजार समिती वरील वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. तर भाजपचे आमदार राहुल कुल यांनी वीस वर्षांपासून असलेल्या बाजार समिती मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडले आहे.
२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने सर्व १९ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले होते. परंतु २०२३ च्या निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने हे वर्चस्व मोडीत काढत १८ पैकी ०९ जागा जिंकल्या आहेत.
भाजपाचे विजयी उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ
कोळपे शरद बापू
खराडे भारत सुखदेव
आखाडे संतोष रघुनाथ
झगडे बापुसाहेब शिवाजी
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ
जगदाळे गणेश अंकुश
ताकवणे अतुल लक्ष्मण
ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
चाबुकस्वार राहूल गणपत
ग्रामपंचायत आर्थिकदृष्टया
दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ
फरगडे अशोक महादेव
हमाल व तोलारी मतदारसंघ
रूपनवर कालिदास किसन
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण मतदार संघ
आटोळे गजिनाथ दादा
ताकवणे आत्माराम साहेबराव
शेळके सचिन लालासो
सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघ
म्हेत्रे जिवन दत्तात्रय
सेवा सहकारी संस्था भटक्या जाती / विमुक्त जमाती विजयी उमेदवार
शिंदे बाळासाहेब मारुती
सोसायटी महिला राखीव मतदार संघ
मोरे वर्षा मुकेश
शिंदे गीतांजली यशवंत
व्यापारी व आडते मतदार संघ
निंबाळकर सुनील विश्वनाथ
निंबाळकर संपत बबन
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Election : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टक्के मतदान..!
Election : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 96.23 टक्के मतदान…!