राहुलकुमार अवचट
Daund News : यवत : दौंड विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्हीए क्षमतेच्या वाहिनीचा पोकार लाकूड वखार ते दौंड पोलीस स्टेशन व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानासमोरील कुरकुंभ फिडरची उच्चदाब वाहिनी भूमिगत करण्याच्या कामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कामासाठी २ कोटी २४ लाख रुपये खर्च अपेक्षित
दौंड व्यापारी पेठेतील व शहर परिसरातील वाहिनी तुटून वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे तसेच पथदिवे बसविण्याचे काम देखील होणार आहे. (Daund News) या कामासाठी एकूण २ कोटी २४ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, त्यापैकी १ कोटी ९२ लाख रूपये महावितरणच्या देखभाल दुरुस्ती योजनेमधून तर उर्वरित ३२ लाख रूपये जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, महावितरणचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, उपकार्यकारी अभियंता विक्रम चव्हाण, दौंड शहर अभियंता बशीर देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, (Daund News) माजी नगरसेवक बबलू कांबळे, शहनवाज पठाण, अमोल काळे, राजू बारवकर, फिलीप धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : शेतातील पिवळं सोनं जगविण्याचे फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर आव्हान
Daund News : निवडणूक आयोगाचा ‘सर्व्हर डाऊन’; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची तारांबळ
Daund News : दौंड शहरात मंजूर केलेला कत्तलखाना तत्काळ रद्द करावा; हिंदू संघटनांची आग्रही मागणी