गणेश सुळ
Daund News : केडगाव : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या प्रती जेजुरी देलवडी येथील खंडोबा मंदिरामध्ये हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ही आंब्याची आरास आंब्याच्या डहाळीसहित केल्याने मंदिराच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडली आहे. (Attractive decoration of hapus mangoes in Khandoba temple at Prati Jejuri Delawadi)
रत्नागिरी येथून हापुस आंबे आणून केली आरास
आंब्याचा हंगाम सुरू असताना देलवडीमधिल खंडोबा भक्त अजित राजेंद्र शेलार यांनी रत्नागिरी येथून हापुस आंबे आणून खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात आरास केली आहे. (Daund News) खंडोबा देवस्थानचे कर्मचारी, पुजारी, सेवक वर्ग, बबन महाराज शिर्के, अजित यांचे कुटुंबीय, मोहन शिर्के, छगन शिर्के, कृष्णा शिर्के व परिसरातील खंडोबा भक्त यांनी रविवार 11 जून रोजी आमराई प्रमाणे ही आरास तयार केली आहे. ही आंब्याची सजावट करीत असताना आंब्याच्या डहाळ्या लावून त्यामध्ये आंबे लावल्याने मंदिराचा गाभारा हिरवागार झाला असल्याने सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. खंडोबा मंदिरामध्ये अनेक वेळा आरास केली जाते. यामध्ये दिवाळीमध्ये फराळाची आरास, प्रत्येक रविवारी विविध फुलांची देखील आरास खंडोबाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये केली जाते. ही आंब्याची आरास केलेले व्हिडिओ, फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल करून भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : अनिकेत थोरात यांचे एमपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश
Daund News : राजा – पोपट संतराज महाराज पालखी रथाचे मानकरी
Daund News :चौफुला येथे पकडला ६३ हजार किंमतीचा गांजा; चार जणांना अटक, यवत पोलिसांची कारवाई